अकोल्यातील विद्यार्थीनी पुण्यात चमकली; स्रेहल सावल फर्ग्युसन महाविद्यालयाच्या 'एलआर'पदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:34 PM2018-09-01T12:34:54+5:302018-09-01T12:36:36+5:30
अकोला - पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीव्दारा संचालीत असलेल्या नवलमल फीरोदीया विधी महाविद्यालयाच्या (फर्ग्युसन) महिला विद्यार्थीनी प्रतिनिधीपदी (एलआर) अकोल्यातील गौरक्षण रोडवरील रहिवासी स्नेहल ओमप्रकाश सावल हीची निवड करण्यात आली आहे
अकोला - पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीव्दारा संचालीत असलेल्या नवलमल फीरोदीया विधी महाविद्यालयाच्या (फर्ग्युसन) महिला विद्यार्थीनी प्रतिनिधीपदी (एलआर) अकोल्यातील गौरक्षण रोडवरील रहिवासी स्नेहल ओमप्रकाश सावल हीची निवड करण्यात आली आहे. तब्बल १८ विद्यार्थीनींनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता, यामधून स्रेहल ही प्रथक क्रमांकावर निवडूण आली आहे.
नवलमल फीरोदीया विधी महाविद्यालयातील महिला विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणुक पार पडली. यामध्ये तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला असलेली स्रेहल ओमप्रकाश सावल ही १८ विद्यार्थीनीमध्ये निवडूण आली आहे. यासोबतच भक्ती मुठा हीचीही महिला विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणूण निवड झाली असून स्वीकृत प्रतिनिधी म्हणूण देवीका भिडे हीची निवड झाली आहे. नवलमल फीरोदीया विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहीनी होनप यांच्याहस्ते स्रेहल सावल हीला गौरविण्यात आले आहे. स्रेहलला तीचे आई-वडील व प्राचार्यासह प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. यासोबतच आरबीएचआर विद्यार्थी भवनच्या महासचिवपदीही स्रेहन सावल हीची एकमताने निवड करण्यात आली आहे.