अकोला : व्याळा येथील शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:46 PM2017-12-08T23:46:46+5:302017-12-08T23:51:04+5:30
व्याळा (अकोला): सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून व्याळा येथील २३ वर्षीय शेतकरी पुत्राने ८ डिसेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश वसंता राऊत, असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

व्याळा येथील गणेश वसंता राऊत यांच्या वडिलांच्या नावाने तीन एकर शेती आहे. या शेतीत त्यांना गेल्या काही दिवसांपासून अल्प उत्पन्न होत होते. गणेश यांच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वीच अपघात झाला आहे. त्यांच्या उपचारावर बराच खर्च झाला. आजारावर खर्च, बँका, सावकाराचे कर्ज आणि सततची नापिकी यामुळे खचून गेलेल्या गणेश वसंता राऊत यांनी राहत्या घरात ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आजीचे अकोटात शुक्रवारी सक ाळी निधन झाले. त्यांचा मृतदेह आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य अकोटला गेले होते. घरात कुणी नसल्याची संधी साधत गणेश यांनी गळफास लावला. एकाच दिवशी कुटुंबातील दोघांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ राऊत कुटुंबावर आली.