अकोल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सागर, 'पीटीसी'चे प्राचार्य शेखर यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:42 PM2018-07-28T13:42:26+5:302018-07-28T13:45:07+5:30
अकोला : राज्यात पोलीस दलातील अधिकार्यांच्या शासनाने बदल्या करण्याचे आदेश शुक्रवारी मध्यरात्री दिले. यात अकाेला येथील अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर आणि बुलडाणा येथील पोलीस अधीक्षक शशीकुमार मिणा यांचा समावेश आहे.
अकोला : राज्यात पोलीस दलातील अधिकार्यांच्या शासनाने बदल्या करण्याचे आदेश शुक्रवारी मध्यरात्री दिले. यात अकाेला येथील अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर आणि बुलडाणा येथील पोलीस अधीक्षक शशीकुमार मिणा यांचा समावेश आहे. अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डाॅ. बी. जी. शेखर यांचीही बदली करण्यात आली आहे.
बुलडाणा येथील पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना यांची मुंबई येथे पोलीस उपायुक्त पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी गोंदिया येथील पोलीस अधीक्षक डी. के पाटील भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोला अप्पर पोलिस अधीक्षक विजयंकात सागर यांची वसई पालघर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांची जागा नंदूरबारचे प्रशांत वाघुडे घेतील. अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी. जे. शेखर यांची मुंबई येथे पदोन्नतीवर पोलिस उपमहानिरीक्षक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाण्याचे सुनील प्रभाकर भारद्वाज अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे नवीन प्राचार्य म्हणून रुजू होतील. काही दिवसांपासून राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत चर्चा सुरू होती. शुक्रवारी उशिरा रात्री पोलीस महासंचालकांच्या आदेशाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.