अकाेला शिक्षक मतदारसंघात साडीचाेळीची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:32 PM2020-11-25T12:32:24+5:302020-11-25T12:35:40+5:30
Akola teacher constituency election निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून प्रलाेभनाचा फंडा
- आशिष गावंडे
अकाेला : अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांकडून मतदारांची मने वळविण्यासाठी प्रलाेभनाचे विविध फंडे आजमावल्या जात आहेत. यातही अकाेला, अमरावती व वाशिम मतदारसंघात शिक्षीकांना साडीचाेळीची भेट वस्तू देण्यावरून राजकारण रंगले असून, साडीचाेळी व नगदी पैसे वाटपाचा हा प्रकार काही उमेदवारांच्या चांगलाच अंगलट आल्याचे समाेर आले आहे.
कधीकाळी शिक्षकांच्या समस्या साेडविण्यासाठी बाेटावर माेजता येणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी शासन दरबारी जीवाचे रान करीत असल्याचे चित्र यंदाच्या निवडणुकीत बाजूला सारण्यात आल्याचे दिसून येत आहे. यंदा अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात तब्बल २७ उमेदवार शड्डू ठाेकून आहेत. असे असले तरीही ही निवडणूक पंचरंगी हाेण्याची शक्यता आहे. काेराेनामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांना मतदारांपर्यंत पाेहाेचण्यास अडचणीचा सामना करावा लागत असला तरीही साेशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार प्रचारात तसूभरही मागे नसल्याचे पाहावयास मिळत आहे. येत्या १ डिसेंबर राेजी मतदान प्रक्रिया असल्याने आर्थिक बाबतीत सधन असलेल्या संघटनांचे उमेदवार असाे किंवा राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांनी प्रलाेभनाचे नानाविध फंडे आजमावण्यास सुरुवात केली आहे. यातील साडीचाेळी व राेख रक्कम वाटपाचा प्रकार काही उमेदवारांच्या अंगलट येऊन पाेलीस ठाण्यात रीतसर तक्रारी करण्यात आल्याने हा विषय चांगलाच चर्चेचा ठरत आहे.
साहेब, पैसा पाठविल्यास जुगाड शक्य!
शिक्षकांच्या समस्या साेडविण्याच्या नावाखाली मुंबईच्या वाऱ्या करणाऱ्या एका उमेदवाराने अमरावती येथील दाैरा आटाेपून अकाेल्यात शिक्षकांना संबाेधित करणाऱ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याकडे निवडणूक फंडाची मागणी केल्याची माहिती आहे. पैसा पाठविल्यास जुगाड शक्य असल्याचे सांगत या उमेदवारानेदेखील साडीचाेळी व भेटवस्तू वाटपाचा मनाेदय व्यक्त केल्याचे बाेलल्या जात आहे.
शिवाजी शिक्षण संस्थेकडे लक्ष
शिक्षकांच्या समस्या साेडविण्यासाठी शासन दरबारी काेणते उमेदवार प्रामाणीक प्रयत्न करतात, याबद्दल सुज्ञ मतदार अवगत आहेत. मतदारांची संख्या सुमारे ३६ हजार असली तरीही श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मत नेमके काेणाच्या पारड्यात जाइल, यावरच उमेदवाराच्या विजयाचा मार्ग माेकळा हाेणार असल्याचे संकेत आहेत.