अकोला : महापालिकेच्या स्थायी समितीत दहा नवीन चेहरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:09 AM2018-03-01T02:09:39+5:302018-03-01T02:09:39+5:30
अकोला : महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीला एक वर्षांंंचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर निकषानुसार आठ सदस्य नवृत्त झाले. नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी बुधवारी मनपाच्या मुख्य सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थायी समितीमधील काँग्रेसचे सदस्य अँड. इक्बाल सिद्दीकी व राष्ट्रवादीप्रणित लोकशाही आघाडीचे मोहम्मद मुस्तफा यांनी ‘स्थायी’च्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यामुळे सभागृहात दहा सदस्यांची निवड करण्यात आली. ‘स्थायी’मध्ये जाण्यासाठी सर्वच नगरसेवक इच्छुक असल्यामुळे नगरसेवकांनी आपसात ‘सेटलमेंट’ केल्याचे यानिमित्ताने पहावयास मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क

महापालिकेत मार्च २0१७ मध्ये १६ सदस्यीय स्थायी समितीचे गठन करण्यात आले होते. स्थायी समितीला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार १६ पैकी आठ सदस्यांना नवृत्त करावे लागते. ईश्वर चिठ्ठीद्वारे आठ सदस्य नवृत्त झाल्यामुळे नवीन आठ सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी मनपात सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे पीठासीन अधिकारी तथा महापौर विजय अग्रवाल यांनी भाजपचे गटनेता राहुल देशमुख, शिवसेनेचे राजेश मिश्रा, काँग्रेसमधून नगरसेवक इरफान खान व राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित लोकशाही आघाडीच्या गटनेत्या शीतल गायकवाड यांच्याकडून लिफाफे स्वीकारले. सर्व लिफाफे भाजपचे गटनेता राहुल देशमुख यांनी उघडून त्यामधील सदस्यांच्या नावाचे वाचन केले. वाचन करून निवड झालेल्या विविध राजकीय पक्षातील सदस्यांचे सभागृहाने स्वागत केले. यावेळी उपमहापौर वैशाली शेळके, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
आठ नव्हे, दहा नगरसेवकांची निवड!
स्थायी समितीमधून आठ सदस्यांना ईश्वर चिठ्ठीद्वारे नवृत्त व्हावे लागले होते. बुधवारी सभा पार पडण्यापूर्वी काँग्रेसमधील ‘स्थायी’चे सदस्य अँड. इक्बाल सिद्दीकी, लोकशाही आघाडीचे मोहम्मद मुस्तफा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सभागृहाने आठ नव्हे, तर दहा नगरसेवकांची निवड प्रक्रिया पूर्ण केली.
सभापतीच्या निवडीकडे लक्ष
मनपाचे स्थायी समिती सभापती बाळ टाले यांचा एक वर्षाचा कार्यकाळ १ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. जोपर्यंंंत नवीन सभापतीची निवड केली जाणार नाही, तोपर्यंंंत बाळ टाले पदावर कायम राहतील. मात्र, त्यांना सभेचे आयोजन करता येणार नाही. सभापती पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले जाईल. या पदावर कोणाची वर्णी लागते, याबाबत भाजपच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.