Akola: ऑनलाइन फसवणूक झालेल्या नागरिकांना सायबर पोलिसांनी १९ लाख दिले परत मिळवून! सायबर पोलिसांची कामगिरी
By नितिन गव्हाळे | Published: May 25, 2024 10:26 PM2024-05-25T22:26:09+5:302024-05-25T22:28:15+5:30
Akola News: विविध प्रकारच्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील एकुण १८ लाख ९८ हजार रूपयांची रक्कम सायबर पोलिसांनी परत मिळवून ती रक्कम फसवणूक झालेल्या नागरिकांना परत देण्यात आली.
- नितीन गव्हाळे
अकोला - विविध प्रकारच्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील एकुण १८ लाख ९८ हजार रूपयांची रक्कम सायबर पोलिसांनी परत मिळवून ती रक्कम फसवणूक झालेल्या नागरिकांना परत देण्यात आली. तसेच सायबर पोलिसांनी सायबर चोरट्यांनी काढलेली ऑनलाइन ३३ लाख रूपये ७२ हजार रूपयांची रक्कम होल्ड करण्यातही यश मिळविले आहे.
बनावट अकाउंटवरून शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळविल्याबाबतचे विविध जाहिराती, व्हिडीओ दाखवुन नागरिकांना प्रलोभन दाखविले जातात. अशा जाहिरातला बळी पडुन अनेक जणांची फसवणुक करण्यात येत आहे. यासोबतच टेलीग्रामवर पार्टटाईम जॉब, टिकीट बुक करणे, इझी मनी, गुगल ॲन्ड रिव्हू, बँकेचे ग्राहक सेवा प्रतिनीधी, केवायसी अपडेट, विद्युत बिल असल्याचे सांगुन देखील फसवणुक केली जाते. जानेवारी ते मे २०२४ पर्यंत सायबर पोलिसांनी विविध प्रकारच्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील एकुण १८ लाख ९८ हजार ५२५ रूपयांची रक्कम मिळवत, नागरिकांना परत केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शंकर शेळके व सायबर पोलिसांनी केली आहे.
बँक खाते, क्रेडिट कार्ड, एटीएमची माहीती शेअर करू नये
नागरिकांनी बँक खात्यांविषयी, केडीट कार्ड किंवा ए.टी.एम. कार्डची वैयक्तीक माहिती कोणालाही फोनद्वारे देवु नये. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक, अथवा ॲप्लीकेशन कोण्या व्यक्तीचे सांगणे प्रमाणे डाउनलोड करू नये. सिमकार्ड केवायसी, विद्युत बिलाबाबत आलेल्या मॅसेजला प्रतिसाद देवू नका. ओएलएक्ससारख्या ॲपवरून अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करताना शहानिशा करूनच आर्थिक व्यवहार करावा. ऑनलाईन आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाइन नंबर १९३० किंवा संकेतस्थळ cybercrime.gov.in वर तक्रार करावी.