अकोला : शिवणी-शिवर रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रस्ताच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:50 AM2017-12-25T01:50:29+5:302017-12-25T01:53:59+5:30

अकोला : विदर्भ-मराठवाड्याला जोडणार्‍या शिवणी-शिवर रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रस्ताच नसून, लहानशी पायी वाट आहे, त्यावरही पथदिवे नाहीत. त्यामुळे मलकापूर, शिवणी-शिवर येथील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असून, रात्रीच्या प्रसंगी भुरट्या चोरांचा सामना करावा लागत आहे.

Akola: There is no road to go to Shimini-Shiva Railway Station! | अकोला : शिवणी-शिवर रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रस्ताच नाही!

अकोला : शिवणी-शिवर रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रस्ताच नाही!

Next
ठळक मुद्देरेल रोको करणार माजी सरपंच राजू वगारे यांचा इशारालोकमत न्यूज नेटवर्क

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भ-मराठवाड्याला जोडणार्‍या शिवणी-शिवर रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रस्ताच नसून, लहानशी पायी वाट आहे, त्यावरही पथदिवे नाहीत. त्यामुळे मलकापूर, शिवणी-शिवर येथील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असून, रात्रीच्या प्रसंगी भुरट्या चोरांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता आणि पथदिव्यांचा प्रश्न संबंधित अधिकार्‍याने एक महिन्याच्या आत मार्गी न लावल्यास रेल रोको करण्यात येणार असल्याचा इशारा मलकापूरचे माजी सरपंच राजू वगारे यांनी प्रसिद्धिपत्रकात दिला आहे.
दक्षिण मध्य रेल्वेवरील पूर्णा- अकोला हा ब्रॉडगेज करण्यात आला आहे. या मार्गावरून आता अकोला-पूर्णा, अकोला-काचीगुडा, नागपूर-कोल्हापूर अशा रेल्वेगाड्या धावत आहेत. सध्या या मार्गावरून अकोला-महू, अकोला-खंडवा, अकोला-जयपूर अशा रेल्वेगाड्या धावतात. २00९ मध्ये अकोला पूर्णा रेल्वे मार्गावर शिवणी-शिवर येथे नवीन स्थानक झाले आहे. ते मुख्यत: औद्योगिक परिसरातील मालवाहतुकीसाठी बांधण्यात आले आहे. येथे जाण्यासाठी काहीच सुविधा नाही.
मराठवाड्यातील परभणी, पूर्णा, परळी नांदेड या भागासह वाशिम जिल्ह्यातील रोजगारासाठी अकोलात आलेल्या बेरोजगारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. अकोल्यावरून वाशिमसाठी  अप-डाउन करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यांना ये-जा करण्यासाठी अकोला-पूर्णा, परळी-अकोला या रेल्वेने प्रवास करणे सोयीचे जाते. शिवणी-शिवर रेल्वेस्थानक एमआयडीसी परिसरात येत असल्यामुळे रेल्वेने प्रवास करण्यामध्ये कामगारांची संख्याही जास्त आहे; मात्र रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रस्ता नाही, पायवाट आहे. त्यावर पथदिवे नाहीत. रात्रीच्या वेळी प्रवाशांना भुरट्या चोरांचा सामना करावा लागतो. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी  रस्ता आणि पथदिव्यांची व्यवस्था करावी, अन्यथा रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू वगारे यांनी प्रसिद्धिपत्रकात केला आहे.

Web Title: Akola: There is no road to go to Shimini-Shiva Railway Station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.