यंदाही बारावीच्या परीक्षेत पुन्हा मुलांपेक्षा मुलीच वरचढ; एकूण निकाल ९१.८५ टक्के

By नितिन गव्हाळे | Published: May 25, 2023 03:49 PM2023-05-25T15:49:21+5:302023-05-25T15:50:00+5:30

बारावीच्या परीक्षेत ११ हजार ८०० मुले तर १० हजार ८३९ मुली उत्तीर्ण झाले आहेत.

Akola, This year too, in the 12th examination, girls are again ahead of boys; Overall result 91.85 percent | यंदाही बारावीच्या परीक्षेत पुन्हा मुलांपेक्षा मुलीच वरचढ; एकूण निकाल ९१.८५ टक्के

यंदाही बारावीच्या परीक्षेत पुन्हा मुलांपेक्षा मुलीच वरचढ; एकूण निकाल ९१.८५ टक्के

googlenewsNext

अकोला : राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता बारावीचा निकाल २५ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. यंदाही बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये जिल्ह्यात मुलींनीच आघाडी मिळविली आहे. अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल ९१.८५ टक्के लागला असून, यात मुलींची टक्केवारी ९४.७० टक्के एवढी आहे. यंदा झालेल्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले.

जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी १३ हजार २६७ मुले, ११ हजार ४९९ मुली अशा एकूण २४ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार २०१ मुले व ११ हजार ४४५ मुली अशा एकूण २४ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी ८६ केंद्रांवरून परीक्षा दिली हाेती. एकंदरीतच बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा उत्कृष्ट निकाल लागला आहे. या निकालामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींनी अपेक्षेनुसार आघाडी मिळविली आहे.

जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा सरस आहे. बारावीच्या परीक्षेत ११ हजार ८०० मुले तर १० हजार ८३९ मुली उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा दरवर्षीप्रमाणे भरघोस निकाल लागला असून, विज्ञान शाखेचे ९८.२८ टक्के विद्यार्थी पास झाले. त्या खालोखाल वाणिज्य शाखेचा ९५.७० टक्के, कला शाखेचा निकाल ८५.७७ टक्के तर व्होकेशनल शाखेचा निकाल ८२.०२ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांचा निकाल उत्कृष्ट लागला असून, विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत निकाल घसरला
गतवर्षी बारावीच्या परीक्षेचा निकालाची टक्केवारी घसरली असून, गतवर्षी अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.८४ टक्के लागला होता. यात मुलींची टक्केवारी ९७.१५ टक्के होती. यंदा हा निकाल ९१.८५ टक्के लागला आहे.

निकालात बार्शीटाकळी तालुका अव्वल
बारावीच्या निकालात जिल्ह्यातून बार्शीटाकळी तालुक्याने अव्वल स्थान पटकावले. बार्शीटाकळी तालुक्याचा निकाल ९६.१५ टक्के लागला आहे तर पातूर तालुक्याचा निकाल ९६.०९ टक्के लागला आहे. त्यानंतर मूर्तिजापूर तालुका ९३.७० टक्के तर अकोला तालुक्याचा निकाल ९२.२३ टक्के लागला आहे.

Web Title: Akola, This year too, in the 12th examination, girls are again ahead of boys; Overall result 91.85 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.