अकोला-तिरुपती एक्स्प्रेसला मार्चअखेरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 19:00 IST2022-01-29T19:00:01+5:302022-01-29T19:00:23+5:30
Akola-Tirupati Express : मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत या गाड्या धावणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.

अकोला-तिरुपती एक्स्प्रेसला मार्चअखेरपर्यंत मुदतवाढ
अकोला : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड रेल्वे विभागामध्ये सध्या धावत असलेल्या अकोला-तिरुपती-अकोला या रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्याचे ठरविले आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत या गाड्या धावणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.
नांदेड रेल्वे विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०७६०५ तिरुपती-अकोला ही साप्ताहिक गाडी २५ मार्चपर्यंत दर शुक्रवारी १२.३० वाजता तिरुपती स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी अकोला स्थानकावर १२.१५ वाजता येणार आहे.
०७६०६ अकोला-तिरुपती ही साप्ताहिक गाडी २७ मार्चपर्यंत दर रविवारी ८.२९ वाजता अकोला स्थानकावरून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ६.२५ वाजता तिरुपती स्थानकावर पोहोचणार आहे. या गाड्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.