आषाढीच्या पर्वावर अकाेला ते पंढरपूर विशेष रेल्वेला हिरवी झेंडी
By आशीष गावंडे | Updated: July 16, 2024 20:43 IST2024-07-16T20:43:39+5:302024-07-16T20:43:49+5:30
खासदार अनुप धोत्रे यांनी वारकऱ्यांचे केले पूजन

आषाढीच्या पर्वावर अकाेला ते पंढरपूर विशेष रेल्वेला हिरवी झेंडी
अकोला: वारकरी संप्रदायाची पताका डाैलाने फडकविणाऱ्या वारकऱ्यांना आषाढी एकादशी पर्वावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रवासाची साेय उपलब्ध व्हावी, या उद्देशातून खासदार अनुप धाेत्रे यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून अकाेला ते पंढरपूर या विशेष रेल्वेला मंगळवारी
हिरवी झेंडी दाखवली. यावेळी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचे त्यांनी पुजन केले.
रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ६ येथून श्री क्षेत्र पंढरपूरसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून अकोला, बुलढाणा,वाशीम, हिंगोली, अमरावती जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपातर्फे वारकऱ्यांना विविध उपयाेगी वस्तू, फराळ वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशाेर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापाैर विजय अग्रवाल, उन्मेश मालू, वसंत बाछुका, गिरीश जोशी, कृष्णा शर्मा,हरिभाऊ काळे, संतोष पांडे, निलेश निनोरे, रमेश करीहार, राहुल देशमुख, धनजंय धबाले, अक्षय जोशी, प्रशांत अवचार, सुमन गावंडे,चंदा शर्मा, आरती घोगलिया, दिलीप नायसे, बबलू पळसपगार, उमेश श्रीवास्तव, गोपाल मुळे, विक्की ठाकुर, हरीश काळे, सुषमा शुक्ला,गायत्री शुक्ला, युवराज दांदळे, गोपाल पारधी आदी उपस्थित होते.