अकोला : गवळीपुरात दोन गटात तुफान हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:05 IST2020-06-15T17:04:52+5:302020-06-15T17:05:10+5:30
या हाणामारीत दोन्ही गटातील सुमारे ३० जनांनी परस्परांवर शस्त्रांनी हल्ला चढविल्याने यामध्ये तब्बल १७ जन जखमी झाले.

अकोला : गवळीपुरात दोन गटात तुफान हाणामारी
अकोला : रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा येथे दोन गटात तूफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी घडली. या हाणामारीत शस्त्र वापरण्यात आल्याने तब्बल १७ जन जखमी झाले असून यामधील दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी १५ जनांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असून दोन जनांवर खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी दोन्ही गटातील सुमारे ३० जनांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
गवळीपुरा येथे गोरवे नामक कुटुंबीय रहिवासी असून त्यांच्याच बाजुला त्यांचे नातेवाईक असलेले कुटुंबीयांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाले. या वादानंतर दोन्ही कुटुंबामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील सुमारे ३० जनांनी परस्परांवर शस्त्रांनी हल्ला चढविल्याने यामध्ये तब्बल १७ जन जखमी झाले असून यामधील दोन जनांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे या दोन जनांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तलवार, पाईप, लोखंडी रॉड तसेच काठीने मारहाण केल्यामुळे या हाणामारीत गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोन्ही गटातील जखमींना सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठवीले. तसेच घटनास्थळ पंचनामा करून परस्परांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.