अकोला : मोरगाव सादीजन येथे दोन गटांमध्ये हाणामारी; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 09:47 PM2018-01-22T21:47:18+5:302018-01-22T21:52:22+5:30
उरळ (अकोला): नजीकच्या मोरगाव सादीजन येथे जागेच्या वादाच्या कारणावरून दोन गटांतील लोकांनी परस्परांच्या घरात बेकादेशीररीत्या घुसून परस्परांना अश्लिल शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी, काठय़ांनी मारहाण केल्याची घटना २२ जानेवारीच्या सकाळी ९ ते १0 वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
उरळ (अकोला): नजीकच्या मोरगाव सादीजन येथे जागेच्या वादाच्या कारणावरून दोन गटांतील लोकांनी परस्परांच्या घरात बेकादेशीररीत्या घुसून परस्परांना अश्लिल शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी, काठय़ांनी मारहाण केल्याची घटना २२ जानेवारीच्या सकाळी ९ ते १0 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेबाबत दोन्ही बाजुंच्या लोकांनी परस्परांविरुद्ध उरळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यांदीवरून व वैद्यकीय अहवालावरून उरळ पोलिसांनी दोन्ही गटातील सात जणांविरुद्ध भा.दं.वि.च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी मोरगाव सादीजनच्या पुष्पा पांडुरंग गिरी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार विजय गिरी, आरती विजय गिरी व लता सुरेश गिरी यांनी जागेच्या वादाच्या कारणावरून २२ जानेवारीच्या सकाळी ९ ते १0 वाजताच्या सुमारास तिच्या घरात संगनमताने घुसून फिर्यादी, तिचा पती व तिची दिराणी यांना अश्लिल शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी पुष्पा गिरी हिची फिर्याद व वैद्यकीय अहवालावरून उपरोल्लेखित व्यक्तींविरुद्ध भा.दं.वि.च्या २९४, ३२३,३२४, ५0४, ५0६,व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच याच प्रकरणी आरती विजय गिरी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पांडुरंग ओंकार गिरी, विष्णू वामन गिरी, पुष्पा पांडुरंग गिरी व उद्धव गिरी यांनी जागेच्या वादाच्या कारणावरून संगनमताने २२ जानेवारीच्या सकाळी ९ ते १0 वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या घरात बेकादेशीररीत्या घुसून अश्लिल शिवीगाळ करीत तिला लाथा-बुक्कयांनी मारहाण केली. तसेच घरातील सामान फेकून दिले. याबाबत फिर्यादी आरती विजय गिरी यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी उपरोल्लेखित व्यक्तींविरुद्ध भा.दं.वि.च्या ३२३, ३२४, ४५२, ५0४ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक हरिदास काळे, जमादार दादाराव लिखार, जमादार संजय तायडे, पोलीस कॉन्स्टेबल ,प्रवीण मोरे हे करीत आहेत.