Akola: पोलिस असल्याची बतावणी करून दोघांनी वृद्धास लुटले! पणज गावाजवळील घटना

By नितिन गव्हाळे | Published: July 14, 2023 08:30 AM2023-07-14T08:30:36+5:302023-07-14T08:30:58+5:30

Akola: दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वृद्धाकडील सोन्याच्या प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या लांबवल्याची अकोट-अंजनगाव रोडवरील पणज गावाजवळ घडली. याप्रकरणात अकोट ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Akola: Two men robbed an old man by pretending to be the police! Incident near Panaj village | Akola: पोलिस असल्याची बतावणी करून दोघांनी वृद्धास लुटले! पणज गावाजवळील घटना

Akola: पोलिस असल्याची बतावणी करून दोघांनी वृद्धास लुटले! पणज गावाजवळील घटना

googlenewsNext

- नितीन गव्हाळे
अकोला - अकोल्यात साडुच्या मुलाचे लग्न आटोपून अकोटला मुक्काम केल्यानंतर १२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचलपुरला दुचाकीने जाणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला अडवून पोलिस असल्याची बतावणी केली आणि पुढे खून झाला असून, तुमच्याकडील अंगठ्या काढून खिशात ठेवा. असे सांगुन वृद्धाकडील सोन्याच्या प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या लांबवल्याची अकोट-अंजनगाव रोडवरील पणज गावाजवळ घडली. याप्रकरणात अकोट ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अचलपुरातील अब्बासपुरा येथे राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी नथ्थुजी संपतराव केचे(७२) यांच्या तक्रारीनुसार १० जुलै रोजी त्यांच्या साडुच्या मुलाचे अकोल्यात लग्न होते. त्यासाठी अचलपुरवरून ते दुचाकीने अकोटला आले. तेथून अकोल्यातील लग्न समारंभ आटोपून ११ जुलै रोजी सकाळी अकोटला गेले. याठिकाणी साळ्याकडे त्यांनी मुक्काम करून १२ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास ते दुचाकीने अचलपुरकडे जाण्यास निघाले. दरम्यान मागाहून दुचाकीवर रेनकोट घातलेले दोन इसम आले. त्यांनी नथ्थुजी केचे यांना अडवून पोलिस असल्याचे सांगितले आणि अकोट येथे खून झाला असून, आरोपींनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्याची बतावणी केली.

तसेच तुमच्याकडील अंगठ्या, घड्याळ काढून द्या आणि खिशात ठेवा. असे सांगितले आणि त्यातील एकाने माझ्याकडील दोन अंगठ्या, घड्याळ घेत, रूमालात बांधून दिला आणि खिशात ठेवण्यास सांगितला. त्यानंतर नथ्थुजी केचे यांनी काही अंतरावर गेल्यानंतर रूमाल उघडून पाहिला असता, घड्याळाव्यतिरिक्त त्यात काहीच नव्हते. पोलिस असल्याची बतावणी करून दोघांनी लुटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अकोट ग्रामिण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Akola: Two men robbed an old man by pretending to be the police! Incident near Panaj village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.