अकोला : पहिल्याच पेपरला दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:47 PM2018-02-21T18:47:28+5:302018-02-21T18:50:05+5:30
अकोला : इयत्ता बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून ८0 परीक्षा केंद्रावर उत्साहात सुरुवात झाली असताना पातूर येथील दोन परीक्षा केंद्रांवर दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना महसूल विभागाच्या पथकाने पकडले.
अकोला : इयत्ता बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून ८0 परीक्षा केंद्रावर उत्साहात सुरुवात झाली असताना पातूर येथील दोन परीक्षा केंद्रांवर दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना महसूल विभागाच्या पथकाने पकडले. या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने निलंबित केले.
बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून २७ हजार ३१९ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. बुधवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. शिक्षण विभागाने पेपरला उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे बुधवारी पेपरच्या अर्धातास आधीपासूनच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर हजेरी लावली. शहरातील सर्वच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी त्यांचे पालक आले होते. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी परीक्षा केंद्रांवरील कॉपीला प्रतिबंध करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने सहा भरारी पथके नियुक्त केली असून, महसूल विभागाच्या अधिकाºयांचे पथकही शिक्षण विभागाच्या मदतीला आले आहे. बुधवारी इंग्रजी विषयाचा पेपर सुरू झाल्यानंतर पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी यांच्या पथकाने तुळसाबाई कावल महाविद्यालय आणि शाहबाबू महाविद्यालयात भेट दिली. या ठिकाणी दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यावर, पुरी यांच्या पथकाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. २२ फेब्रुवारी रोजी ११ ते २ या वेळेत हिंदी विषयाचा पेपर आहे. २३ फेब्रुवारीला मराठी विषयाचा पेपर राहील. (प्रतिनिधी)