अकोला शहरात अस्वच्छतेचा कळस; मनपाची आरोग्य यंत्रणा झोपेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 02:29 PM2018-07-25T14:29:11+5:302018-07-25T14:31:32+5:30
अकोला: ऐन पावसाळ््यात शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, शहरात साथरोगांचा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे.
अकोला: ऐन पावसाळ््यात शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, शहरात साथरोगांचा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे. प्रशासकीय प्रभागांसह पडीत प्रभागांची अवस्था अत्यंत केविलवाणी असून, नागरिकांच्या हिताचा आव आणणाऱ्या मनपाच्या आरोग्य यंत्रणेने झोपेचे सोंग घेतले असून, क्षेत्रीय अधिकारी आणि नगरसेवक आहेत तरी कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. साफसफाईच्या मुद्यावर आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आल्यानंतरही सत्तापक्षातील पदाधिकाºयांनी साधलेल्या चुप्पीवर अकोलेकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
अकोलेकरांना साफसफाई, पथदिवे, पाणीपुरवठा,रस्ते आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. मनपाच्या आस्थापनेवर ७४८ सफाई कर्मचारी असून, त्यांची प्रशासकीय प्रभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून, बहुतांश कर्मचाºयांना जाणीवपूर्वक कार्यालयांमध्ये नियुक्त केले आहे. तर उर्वरित ११ प्रभागांमध्ये (पडीत) खासगी तत्त्वावर सफाई कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. पडीत प्रभागांमध्ये केवळ चार ते पाच खासगी कर्मचाºयांच्या माध्यमातून केवळ सर्व्हिस लाइनची स्वच्छता करण्याचे काम केले जाते. बहुतांश पडीत प्रभागातील साफसफाईचे कंत्राट नगरसेवक किंवा त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांनी मिळवले आहेत. यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे. मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा, बाजारपेठ, खुली मैदाने तसेच प्रभागांमध्ये दैनंदिन साफसफाई होणे अपेक्षित असताना प्रभागात पंधरा-पंधरा दिवस सफाई कर्मचारी फिरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रभागातील नाल्या-गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. नाल्या तुंबल्याने डासांची पैदास वाढली असून, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. प्रभागांमधील साफसफाईची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाºयांची असली तरी प्रभागांमधील चित्र पाहता, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित नगरसेवकांच्या कार्यशैलीवर अकोलेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आरोग्य निरीक्षकना अभय!
सफाई कर्मचाºयांनी प्रभागात केलेल्या दैनंदिन साफसफाईची पाहणी करून तसा अहवाल क्षेत्रीय अधिकाºयांकडे सादर करण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर निश्चित करण्यात आली आहे. बहुतांश आरोग्य निरीक्षक नगरसेवकांच्या इशाºयानुसार काम करतात. पावसाळ््यात निर्माण झालेली समस्या लक्षात घेता, आरोग्य निरीक्षक ांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्हे उपस्थित झाली आहेत. प्रभागांमध्ये घाण, अस्वच्छता आढळून आल्यास आरोग्य निरीक्षकांचे वेतन कपात करण्याची गरज असताना प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते.