पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमापासून विद्यार्थी वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 05:05 PM2018-06-07T17:05:36+5:302018-06-07T17:05:36+5:30
अकोला : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता यावे, याकरिता तीन वर्षांपूर्वी अकोल्याला शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय मिळाले; पण अद्याप जागाच उपलब्ध न झाल्याने महाविद्यालय सुरू झाले नाही आणि त्यामुळे विद्यार्थी पदवी अभ्यासक्र प्रवेशापासून वंचित आहेत.
अकोला : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता यावे, याकरिता तीन वर्षांपूर्वी अकोल्याला शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय मिळाले; पण अद्याप जागाच उपलब्ध न झाल्याने महाविद्यालय सुरू झाले नाही आणि त्यामुळे विद्यार्थी पदवी अभ्यासक्र प्रवेशापासून वंचित आहेत. आता पुन्हा जागा निश्चित करण्यात आल्याचे वृत्त असून, पदव्युत्तर पशू व विज्ञान संस्थेच्या जागेवर हे महाविद्यालय होणार आहे.
पश्चिम विदर्भात शासकीय पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयच नसल्याने येथील विद्यार्थ्यांना या शिक्षणासाठी नागपूर, मराठवाडा, पश्चिम मराठवाडा किंवा मुंबईला जावे लागायचे, हे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे अनेकजण इतक्या दूर जात नव्हते. याच अनुषंगाने शासनाने पश्चिम विदर्भात अकोला व खान्देश असे दोन पदवी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात परवानगी देऊन दोन्ही ठिकाणी प्रत्येकी पाच कोटी रुपये निधी मंजूर केला; पण गत तीन वर्षांपासून केवळ जागेअभावी हे महाविद्यालय सुरू होऊ शक ले नाही. मागच्या वर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची वाशिम रोडवरील जागा संशोधनासाठी उपयुक्त असून, महाविद्यालय बांधण्यासाठी निश्चित करण्यात आली होती. आता पुन्हा यात फेरबदल करण्यात आल्याचे वृत्त आहे. जेथे या विषयाशी निगडित पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जातो, तेथे हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. महाविद्यालय मंजूर झाले त्याचवेळी पदव्युत्तर पशुविज्ञान संस्थेच्या जागेवर वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव होता; पण यात सारखे बदल होत गेले. महाराष्टÑ पशुविज्ञान विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरूं चेही याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रयोगशाळा व वर्ग घेण्यास जागा असूनही तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाला प्रवेशापासून ताटकळत ठेवण्यात आले.
स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची जागा उपलब्ध
पदवी अभ्यासक्रम पाच वर्षांचा असल्याने ३०० विद्यार्थी येथे असतील. उर्वरित स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे १२० विद्यार्थी म्हणजेच जवळपास ५०० विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत. त्यासाठीची जागा स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेकडे आहे. यामध्ये काही जागा घ्यावी लागेल. त्यासाठीची कृषी विद्यापीठाची जागाही उपलब्ध आहे. असे असताना नवीन इमारतीचा घाट घातला जात होता.
पदव्युत्तर संस्थेच्या जागेवर एकत्र शैक्षणिक संकुल असावे, यासाठी पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय येथे सुरू करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे; पण हे आपल्या हाती नाही.
डॉ. हेमंत बिराडे