अकोला : पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचाही ‘पीएफ’चा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:22 PM2018-09-11T13:22:05+5:302018-09-11T13:23:38+5:30
पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाºयांच्याही भविष्य निर्वाह निधीचा घोटाळा झाल्याची माहिती आहे.
अकोला : बाळापूर पंचायत समितीमध्ये ४५० पेक्षाही अधिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीची १ कोटी २० लाख रुपये कपात करूनही ती वरिष्ठांकडे सादर न केल्याचा प्रकार घडला असताना, पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाºयांच्याही भविष्य निर्वाह निधीचा घोटाळा झाल्याची माहिती आहे. २०१५-१६ पासून हा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे, त्याकडे वरिष्ठ कार्यालय असलेल्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयाचे कमालीचे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे.
बाळापूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कर्मचाºयांच्या वेतनातून दरमहा कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम वरिष्ठ कार्यालयात जमाच झाली नाही. फेब्रुवारी ते जुलै २०१८ दरम्यानची ही रक्कम १ कोटी २० लाख रुपये आहे. या प्रकरणात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांकडे केली. बाळापूर पंचायत समितीमध्ये सातत्याने हे प्रकार घडत आहेत. पाणी पुरवठा विभागाच्या २१ चतुर्थश्रेणी कर्मचाºयांवरही हा अन्याय झाला आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षातील चार हप्ते, तर २०१६-१७ या वर्षातील संपूर्ण हप्त्याची भविष्य निर्वाह निधीची कपात केलेली रक्कम तब्बल १२ महिने संबंधित कार्यालयात पाठविण्यातच आलेली नाही. त्यातीलच हप्ते अजूनही कर्मचाºयांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. सोबतच पतसंस्था व इतर कपातीसंदर्भातही हे प्रकार घडत आहेत.
त्यातून पाणी पुरवठा विभागाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाºयांवर आर्थिक अन्याय केला जात आहे. भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर मिळणाºया व्याजापासून त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे. कपात केलेली रक्कम जमा न करणे, हा मोठा आर्थिक घोटाळा असतानाही जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयाचे त्याकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. सातत्याने घडत असलेल्या या प्रकरणी संबंधितांवर कारवाई न करता मोकाट सोडले जात असल्याने कर्मचाºयांवर अन्याय होत आहे.