अकोला पाणीपुरवठा योजना ‘एमजीपी’कडे देण्यासाठी घेणार बैठक!

By admin | Published: June 28, 2014 01:37 AM2014-06-28T01:37:41+5:302014-06-28T01:42:16+5:30

डीपीसी’च्या सभेत पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांची ग्वाही

Akola water supply scheme will be organized to give MGP! | अकोला पाणीपुरवठा योजना ‘एमजीपी’कडे देण्यासाठी घेणार बैठक!

अकोला पाणीपुरवठा योजना ‘एमजीपी’कडे देण्यासाठी घेणार बैठक!

Next

अकोला : अकोला शहर पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडे (एमजीपी) हस्तांतरित करण्यासाठी मंत्रालयात पुढील आठवड्यात संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र दर्डा शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.रणजीत पाटील, आ.हरीष पिंपळे, आ. संजय गावंडे, वसंतराव खोटरे, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, महापालिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलिस उपअधीक्षक सुरेश खाटमोडे पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
शहरातील पाणीपुरवठा योजनेची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, शहराला नियमीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उपाययोजनांची गरज असल्याचा मुद्दा ह्यडीपीसीह्ण सदस्य तथा नगरसेवक सुनील मेश्राम यांनी उपस्थित केला. त्यानुषंगाने अकोला शहराची पाणीपुरवठा योजना ह्यएमजीपीह्णकडे सुपूर्द करणे अत्यंत आवश्यक असून, यासंदर्भात एमजीपीच्या संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच शहराची पाणीपुरवठा एमजीपीकडे सुपूर्द करण्याच्या विषयावर पुढील आठवड्यात मुंबई येथील मंत्रालयात संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
या सभेत समिती सदस्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शेतकर्‍यांनी ८0 टक्के रक्कमेचा भरणा केल्यावरही कृषी पंपांचे जळालेले ट्रान्सफॉर्मर उशिरा दुरुस्त करुन बसविण्यात आले, त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याचा मुद्दा आ.हरिष पिंपळे यांनी उपस्थित केला. कृषी पपांच्या वीज जोडणीबाबत प्रलंबित प्रकरणांसदर्भात आ.डॉ.रणजीत पाटील यांनी सभेत विचारणा केली. तसेच सोयाबीन आणि कपाशीचे उपलब्ध बियाणे आणि कृषी विभागामार्फत करण्यात आलेले नियोजन, याबाबतचा मुद्दा आ.संजय गावंडे आणि आ.डॉ.रणजीत पाटील यांनी उपस्थित केला. निधी उपलब्ध असूनही जिल्ह्यातील ४ हजार ७00 गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत निधी वाटप का करण्यात आला नाही, असा प्रश्न माजी आमदार डॉ.जगन्नाथ ढोणे यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी प्राप्त झालेला निधी वाटप करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी यावेळी दिली. दलितेतर योजनेंतर्गत महापालिकेच्या प्रस्तावाला जून्याच ह्यडीपीआरह्णनुसार मंजूरी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विजय अग्रवाल यांनी केली. तेल्हारा शहर हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून, या प्रस्तावाला मंजूरी देण्याची मागणी तेल्हारा नगरपालिका उपाध्यक्ष जयश्री मानखैर यांनी तर अकोला शहराच्या सर्वेसाठी मनपाला शासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी नगरसेविका उषा विरक यांनी या सभेत केली. या सभेला समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Akola water supply scheme will be organized to give MGP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.