अकोला शहराचा पाणीपुरवठा २४ व २५ मे राेजी राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 11:05 AM2021-05-23T11:05:44+5:302021-05-23T11:05:54+5:30

Akola Water supply : मजीप्राच्या या कामाला मनपा प्रशासनाने मंजुरी दिली असून, अकाेलेकरांना दाेन दिवस विलंबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे़

Akola water supply will be closed on May 24 and 25 | अकोला शहराचा पाणीपुरवठा २४ व २५ मे राेजी राहणार बंद

अकोला शहराचा पाणीपुरवठा २४ व २५ मे राेजी राहणार बंद

googlenewsNext

अकोला : महान धरणाच्या पायथ्याशी असलेल्या मनपाच्या ६०० व्यासाच्या जलवाहिनीला मूर्तिजापूर व खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत महान ते उन्नई बंधाऱ्यापर्यंतच्या ६०० व्यासाच्या जलवाहिनीची जाेडणी केली जाणार आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत सदरचे काम दाेन दिवसाच्या कालावधीत पूर्ण केले जाणार असून, या अत्यावश्यक कामासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा २४ व २५ मे राेजी बंद ठेवावा लागणार आहे़ मजीप्राच्या या कामाला मनपा प्रशासनाने मंजुरी दिली असून, अकाेलेकरांना दाेन दिवस विलंबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे़

‘अमृत’अभियानांतर्गत महान धरण ते अकाेला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे टाकणे, शहरात जलवाहिनीचे जाळे बदलणे व नवीन आठ जलकुंभ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे़ जलवाहिनीचे नवीन जाळे टाकण्यात आल्याने पाण्याचा अपव्यय कमी हाेईल, असा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे़ यादरम्यान मूर्तिजापूर व खांबाेरा प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेंतर्गत महान धरणातून उन्नई बंधाऱ्यापर्यंत पाणीपुरवठा केला जाताे़ जलवाहिनीचे जाळे टाकल्यास पाण्याचा माेठ्या प्रमाणात हाेणारा अपव्यय टाळता येणार आहे़ यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध हाेईल़ त्या अनुषंगाने महान धरण ते उन्नई बंधाऱ्यापर्यंत ६०० व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ केला जाणार आहे़ त्यासाठी महान धरणाच्या पायथ्याशी असलेल्या मनपाच्या ६०० व्यासाच्या जलवाहिनीला जाेडणी करावी लागणार आहे़ यासाठी किमान दाेन दिवसाचा कालावधी लागणार आहे़

 

अकाेलेकरांनाे पाणी जपून वापरा !

शहरवासीयांना २४ व २५ मे राेजी पाणीपुरवठा हाेऊ शकणार नाही़ त्यामुळे नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून त्याचा जपून वापर करण्याचे आवाहन मनपाच्या जलप्रदाय विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी केले आहे.

Web Title: Akola water supply will be closed on May 24 and 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.