Maharashtra Election 2019 : अकोला पश्चिम : भाजपवर ‘प्रहार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:43 PM2019-10-05T12:43:30+5:302019-10-05T12:43:38+5:30

दोन्ही उमेदवारांच्या भूमिकेमुळे भाजपसह काँग्रेसच्या डोकेदुखीत वाढ होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

Akola West: 'hit' on BJP |  Maharashtra Election 2019 : अकोला पश्चिम : भाजपवर ‘प्रहार’

 Maharashtra Election 2019 : अकोला पश्चिम : भाजपवर ‘प्रहार’

Next

- आशिष गावंडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी तसेच काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवरील पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळेवर बंडाचा झेंडा फडकावला. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांनी प्रहार जनशक्ती पक्ष तसेच काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज सादर केला. या दोन्ही उमेदवारांच्या भूमिकेमुळे भाजपसह काँग्रेसच्या डोकेदुखीत वाढ होणार असल्याचे बोलल्या जात आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी दिवसभर राजकीय नाट्य रंगले होते. भाजपचा अभेद्य गड म्हणून ओळखल्या जाणाºया या मतदारसंघात भाजपकडून चेहरा बदलला जाईल, अशी इच्छुकांना अपेक्षा होती. त्यासाठी काहींनी खुलेआम उमेदवारीची इच्छा दर्शविली तर काही ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत होते. पक्षाने तब्बल सहाव्यांदा आ. शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आणि इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले. ही खदखद मनात बाळगून असलेल्या इच्छुकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्याचे समोर आले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीतील विद्यमान सदस्य तथा माजी महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनी दुपारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने अधिकृत उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज सादर करीत स्वपक्षीयांच्या डोकेदुखीत वाढ केली आहे.


शिवसेनेची तलवार म्यान
हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा, यासाठी जीवाचे रान करणाºया शहर कार्यकारिणीतील काही पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. शुक्रवारी दुपारी २ वाजता उमेदवारी अर्ज सादर करण्याची चर्चा होती. यादरम्यान कोठे माशी शिंकली, देव जाणे, सेनेतील नाराज इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर न करता तलवार म्यान केल्याचे समोर आले.


अ‍ॅड. आंबेडकरांचे धक्कातंत्र!
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण नेहमीच धक्कातंत्र देणारे ठरले आहे. ‘वंचित’ने प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या यादीत अकोला पश्चिम मतदारसंघासाठी इम्रान पुंजानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. शुक्रवारी अचानक काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा माजी महापौर मदन भरगड यांना गळाला लावत त्यांना ‘वंचित’ची उमेदवारी देण्यात आली. अर्थात, भरगड यांच्या माध्यमातून काँग्रेसला ‘लक्ष्य’ करण्याची संधी साधल्याचे चित्र आहे.

Web Title: Akola West: 'hit' on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.