अकोला होलसेल फळ बाजारही जाणार शहराबाहेर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 08:13 PM2017-10-05T20:13:55+5:302017-10-05T20:15:39+5:30

अकोला : ट्रान्सपोर्ट, होलसेल किराणा बाजारच्या पाठोपाठ आ ता अकोला होलसेल फळ बाजारही शहराबाहेर जात असल्याचे  संकेत आहेत. तशा हालचाली शहरात सुरू झाल्या असून,  असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी आठ एकर जागा पातूर मार्गावर  घेतली आहे. या जागेवर उभारल्या जाणार्‍या अद्ययावत  मार्केटचा नकाशा महापालिकेकडे मंजुरीसाठी टाकला आहे.  महापालिकेच्या नगर रचना विभागाची मंजुरी मिळताच या  कामाला सुरुवात होणार आहे.

Akola wholesale fruit market will be out of town! | अकोला होलसेल फळ बाजारही जाणार शहराबाहेर!

अकोला होलसेल फळ बाजारही जाणार शहराबाहेर!

googlenewsNext
ठळक मुद्देपातूर मार्गावर घेतली असोसिएशनने आठ एकर जागाया जागेवर उभारणार अद्ययावत मार्केट नकाशा मार्केट नकाशा  महापालिकेकडे मंजुरीसाठी सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ट्रान्सपोर्ट, होलसेल किराणा बाजारच्या पाठोपाठ आ ता अकोला होलसेल फळ बाजारही शहराबाहेर जात असल्याचे  संकेत आहेत. तशा हालचाली शहरात सुरू झाल्या असून,  असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी आठ एकर जागा पातूर मार्गावर  घेतली आहे. या जागेवर उभारल्या जाणार्‍या अद्ययावत  मार्केटचा नकाशा महापालिकेकडे मंजुरीसाठी टाकला आहे.  महापालिकेच्या नगर रचना विभागाची मंजुरी मिळताच या  कामाला सुरुवात होणार आहे.
शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी शहरातील ट्रान्स पोर्ट नगर एमआयडीसीत सर्वप्रथम हलविण्यात आले. त्यानंतर  शहरातील होलसेल किराणा बाजार वाशिम बायपास मार्गावर  हलविण्यात आले. दोन मोठय़ा बाजारपेठा यशस्वीपणे  हलविल्या गेल्याने जनता बाजारातील होलसेल भाजी बाजार  हलविण्याचे प्रयोग सुरू झाले. या प्रयोगानंतर आता जनता  बाजारातील अकोला होलसेल फ्रुट्स अँण्ड व्हेजीटेबल मार्केट  हलविले जात आहे.
कधीकाळी जैन भाजी बाजारातील मटका बाजाराजवळ  होलसेल भाजी बाजार भरायचा; मात्र तत्कालिन नगरपालिका  प्रशासनाने हा भाजी बाजार १९७४ मध्ये जनता बाजारात  आणला. तेव्हापासून ही ठोक बाजारपेठ येथेच आहे. नो एण्ट्री  आणि वाहतुकीच्या समस्येतून सुटका मिळण्यासाठी महा पालिका आयुक्त अजय लहाने यांनी असोसिएशनकडे  प्रस्ताव  ठेवला. अकोला होलसेल फ्रुट्स अँण्ड व्हेजीटेबल  असोसिएशनचे पदाधिकारी यांनी पातूर मार्गावरील पुलाजवळ  आठ एकर जागा मालकीची घेतली आहे. या ठिकाणी आता  २00 अद्ययावत दुकान उभारले जात असून, प्रस्तावित  आराखड्याचा नकाशा महापालिकेच्या नगर रचना विभागाकडे  २२ सप्टेंबर रोजी मंजुरीसाठी टाकलेला आहे. महापालिकेकडून  मंजुरी मिळताच होलसेल फ्रुट बाजाराच्या बांधकामाला सुरुवात  होणार आहे. एका वर्षाच्या आत ही अद्ययावत बाजारपेठ अस् ितत्वात आणण्याचा प्रयत्न या पदाधिकार्‍यांचा आहे.

कार्यकारिणीचा पुढाकार
अध्यक्ष आरिफ खानसह असोसिएशनचे पदाधिकारी  सचिव  मुजाहिल अहेमद खान, मोहमंद युसूफ, शेख फारूख, उपाध्यक्ष  रसूल खा, हयात खा यांच्या पुढाकारात होलसेल फ्रुट बाजारा तील जवळपास ४00 सदस्यांचे विशेष प्रयत्न यासाठी सुरू  आहेत. 

ठोक भाजी बाजारासोबतच आम्हीही बाजारपेठ थाटण्याचा  विचार पदाधिकार्‍यांपुढे ठेवला. त्याला सर्व पदाधिकार्‍यांनी 
एकमताने मंजुरी देत शेअर दिला. त्यामुळे आमचा प्रयत्न  लवकरच यशस्वी होईल.
- आरीफ खान, 
अध्यक्ष, होलसेल फ्रुट अँण्ड व्हेजीटेबल असोसिएशन,  अकोला.

Web Title: Akola wholesale fruit market will be out of town!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.