अकोल्याला वानऐवजी जिगाव प्रकल्पातून पाणी देणार - संजय कुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 04:14 PM2019-09-16T16:14:40+5:302019-09-16T16:15:06+5:30

अकोला शहराला वानऐवजी जिगाव प्रकल्पात पाणी आरक्षित करता येईल, असा पर्याय राज्याचे कामगार कल्याण मंत्री संजय कुटे यांनी सुचविला.

Akola will be given water from Jigaon Project instead of Van - Sanjay Kute | अकोल्याला वानऐवजी जिगाव प्रकल्पातून पाणी देणार - संजय कुटे

अकोल्याला वानऐवजी जिगाव प्रकल्पातून पाणी देणार - संजय कुटे

Next

अकोट : अकोला शहराला वान धरणातून पाणी देण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या पृष्ठभूमीवर अकोला शहराला वानऐवजी जिगाव प्रकल्पात पाणी आरक्षित करता येईल, असा पर्याय राज्याचे कामगार कल्याण मंत्री संजय कुटे यांनी सुचविला. अकोट येथे भाजपच्या पेज प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे अकोट मतदारसंघातील पेज प्रमुख यांच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आ. प्रकाश भारसाकळे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कामगार कल्याण व मागासवर्गीय विकासमंत्री ना. संजय कुटे उपस्थित होते. ना. कुटे पुढे म्हणाले की, जिगाव हा प्रकल्प वानपेक्षा खूप मोठा आहे. या प्रकल्पातून अकोल्याला पाणी दिले तर अंतर २० ते २२ किमी वाढेल. ते सोयीचे होणार आहे. त्यामुळे भविष्यात अकोल्यासाठी जिगावमधून पाणी आरक्षित करून ते शहरापर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार भारसाकळे यांना मदत करू, अशी ग्वाहीही ना. कुटे यांनी यावेळी दिली. आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अकोट विधानसभेत गत पाच वर्षांत केलेल्या कामाची माहिती सर्वांसमोर मांडली. भविष्यात हा मतदारसंघ पूर्णपणे विकसित करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी अकोटमधील मीराजी महाराज संस्थानला दीड कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल संस्थानच्यावतीने आमदार भारसाकळेयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तेजराव थोरात, अ‍ॅड. बाळासाहेब आसरकर, श्रीकृष्ण मोरखडे, डॉ. संजय शर्मा, पुरुषोत्तम चौखंडे, शेरूद्दीनभाई, अबरारभाई, राजेश नागमते, नयना मनतकार, जयश्री पुंडकर, हरिनारायण माकोडे, संदीप उगले, राजेश रावणकर, कणक कोटक, गजानन उंबरकर, रामदास भेंडे, ओम सुईवाल, राजेश पाचाडे, मधुकर पाटकर, अनिरुद्ध देशपांडे, संतोष राऊत, मुश्ताक पटेल, संतोष झुनझुनवाला, उमेश बहाकर, रवींद्र केवटी, योगेश पुराडउपाध्ये, विठ्ठल वाकोडे, श्याम गावंडे, मंगेश पटके, मनोज चंदन, विलास बोडखे, रमेश दुतोंडे, उमेश पवार, प्रदीप मोरे, पुंजाजी मानकर, अतुल सोनखासकर, दीपक मुंडकार, सरपंच दिनेश पवार, सरपंच गणेश शनवारे, सरपंच गणेश पवार, माजी सरपंच माणिकराव सोनोने, संजय सोनोने, अनिल सोनोने व विक्रम सोलकर यांनी केला. यावेळी मोठ्या संख्येने पेज प्रमुख, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी बांधव उपस्थित होते.

 

Web Title: Akola will be given water from Jigaon Project instead of Van - Sanjay Kute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.