अकोल्याची सर्वाधिक रक्तपेढ्या व रक्तदात्यांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण होईल - डॉ. राजेश कार्यकर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 01:18 PM2018-12-26T13:18:06+5:302018-12-26T13:18:11+5:30

अकोला: येणाऱ्या वर्षात सर्वात जास्त ब्लड बॅक व रक्तदाते म्हणून हा जिल्हा ओळखला जाणार आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेश कार्यकर्तेयांनी मंगळवारी दिली.

Akola will be identified as a most blood bank and blood donors district - Dr. Rajesh karykarte | अकोल्याची सर्वाधिक रक्तपेढ्या व रक्तदात्यांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण होईल - डॉ. राजेश कार्यकर्ते

अकोल्याची सर्वाधिक रक्तपेढ्या व रक्तदात्यांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण होईल - डॉ. राजेश कार्यकर्ते

Next

अकोला: येणाऱ्या वर्षात सर्वात जास्त ब्लड बॅक व रक्तदाते म्हणून हा जिल्हा ओळखला जाणार आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेश कार्यकर्तेयांनी मंगळवारी दिली.
डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या १२० व्या जयंती उत्सवानिमित्त श्री. शिवाजी महाविद्यालयात २४ ते २७ डिसेंबरपर्यंत चार दिवस प्रबोधनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. जयंती उत्सवाच्या दुसºया दिवशी सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. सकाळी १० वाजता युवा रक्तदान शिबिराचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याहस्ते करण्यात आले. भाषणामध्ये डॉ. कार्यकर्ते यांनी अकोला जिल्ह्यात येणाºया वर्षात सर्वात जास्त ब्लड बँक असणारा जिल्हा होण्याचा मनोदय व्यक्त केला. रक्तदान ही लोकचळवळ व्हायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. याप्रसंगी युवा विश्व रक्तदाता संघाचे अ‍ॅड. संतोष गावंडे यांनी युवा विश्व संघाच्या कार्याबद्दल व रक्तदान शिबिराबद्दल माहिती दिली. एका व्यक्तीच्या रक्तदानातून चार जणांचे प्राण वाचत असते व युवकांनी सुदृढ शरीरासाठी व विविध चाचण्या होण्याच्या दृष्टीनेही रक्तदान शिबिराचा उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
सकाळच्या सत्राच्या कार्यक्रमाला अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.संतोष कोरपे यांनी ‘नेशन बिल्डिंग’ मध्ये तरुणांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगताना सौर उर्जेचा उपयोग व्हावा, असा शाश्वत विकासाचा संदेश दिला. पहिल्या सत्राच्या युवा रक्तदान शिबिरामध्ये महाविद्यालयामध्ये रक्तदानाकरिता विद्यार्थ्यांचा व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचा सहभाग होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संतोषकुमार कोरपे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अनंत डवंगे, मनपा नगरसेवक आरती घोगलिया, नगरसेवक राजेश गिरी, रक्तदान समन्वयक डॉ. अर्चना पेठे, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे आदींची उपस्थिती होती. संचालन शुभम भोंडे यांनी तर आभार डॉ संजय तिडके यांनी मानले.
दुपारच्या सत्रात खुली प्रश्नमंजूषा आयोजित केली होती. प्रश्नमंजूषेचे संयोजन प्रा. नितीन मोहोड यांनी केले. स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीने ही स्पर्धा रंगतदार झाली व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. यानंतर स्व. संध्या उखळकर स्मृतिप्रीत्यर्थ भावगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शिवाजी महाविद्यालय अकोलाद्वारे पूर्वा देशमुख, रागिणी खोडवे, विदर्भ संगीत अ‍ॅकॅडमी अकोलाद्वारे गोपाल गावंडे, शुभम नारे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाद्वारे वैशाली पांडे, वैभव निंबाळकर, एल.आर.टी महाविद्यालयाद्वारे अंकिता पांडे, श्रृती जहागिरदार तसेच सीताबाई महाविद्यालयाचे भावगीत स्पर्धेचे प्रतिनिधित्व मुक्ता धुमाळे या विद्यार्थिनींनी केले.

 

Web Title: Akola will be identified as a most blood bank and blood donors district - Dr. Rajesh karykarte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.