विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेत अकोला महिला संघाला उपविजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:46 PM2019-08-06T13:46:54+5:302019-08-06T13:47:01+5:30
अकोला: अचलपूर येथे आयोजित विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेत संत गाडगेबाबा व्यायामशाळेच्या महिला मल्लांनी अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत उपविजेतेपद पटकाविले.
अकोला: अचलपूर येथे आयोजित विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेत संत गाडगेबाबा व्यायामशाळेच्या महिला मल्लांनी अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत उपविजेतेपद पटकाविले. अकोला महिला संघाने या स्पर्धेत २ सुवर्ण व ३ कांस्यपदकांची कमाई केली.
४० किलो वजनगटात नेहा बमन हिने कांस्यपदक, ४४ किलो वजनगटात नालंदा दामोदर हिने सुवर्णपदक, ४८ किलो वजनगटात कविता राठोड हिने कांस्यपदक, ५५ किलो वजनगटात प्रेरणा अरू ळकर हिने सुवर्णपदक, ५९ किलो वजनगटात अंजली कोटरवारने कांस्यपदक पटकाविले. स्पर्धा आयोजक आमदार बच्चू कडू यांनी मुलींचे कौतुक करू न इनामी रक्कम व पदक देऊन कुस्तीगीरांना सन्मानित केले. तसेच यावेळी वस्ताद राजेंद्र गोतमारे यांचादेखील सत्कार करण्यात आला.
स्पर्धेला अकोल्यातील मल्ल राजेश नेरकर, राजेश इंगळे, नाना गोसावी, अशोक घोडके, राजेश राठोड, राजेश श्रीनाथ, सुरेश गर्गे, नारायण नागे, कुणाल माधवे, शिवा सिरसाट यांनी तीन दिवस हजेरी लावून कुस्तीगीरांना प्रोत्साहन देऊन आत्मविश्वास वाढविला. पदकविजेत्या मल्लांना वस्ताद राजेंद्र गोतमारे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.