अकोल्यातील युवा उद्योजकाची सातासमुद्रापार भरारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2016 01:40 AM2016-01-12T01:40:40+5:302016-01-12T01:40:40+5:30
जर्मनीत कंपनी सुरू केल्यानंतर आता भारतातही व्यवसाय विस्तार
अकोला : उद्योगांचा मोठा अनुशेष असलेल्या अकोल्यासारख्या शहरातील युवकाने उद्योगक्षेत्रात सातासमुद्रापार भरारी घेतली. हा युवक आजच्या युवा पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
माजीमंत्री बाबासाहेब धाबेकर यांचा नातू रोहन सुनील धाबेकर यांनी शिक्षणक्षेत्रात मोठी क्षेप घेतली. त्यानंतर देश-विदेशात वेगवेगळय़ा क्षेत्रात काम केल्यानंतर र्जमनीत उद्योग सुरू केला. स्वत:ची बँकींग कंपनी स्थापन केली. दोन वर्षांत ही कंपनी नावारूपाला आणल्यानंतर मायदेशी बंगळुरू येथेसुद्धा कंपनी स्थापन करून, त्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकपद रोहन स्वत: सांभाळत आहे. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. आर्मी ऑफिसर म्हणून काम करताना ७८ गुरखा रायफल रेजिमेंटमध्ये देशसेवा केली. लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर २ वर्षे लंडन येथील 'गोल्डमॅन सॅक्स' या जगविख्यात बँकेत काम केले. त्यानंतर र्जमनीची राजधानी बर्लिन येथे कंपनी सुरू केली. दोन वर्षांत ही कंपनी नावारूपाला आणली. तीच कंपनी आता बंगळुरू येथे सुरू केली आहे. दिशाहीन झालेल्या युवकांसाठी त्यांचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. अर्थातच अशा उद्योगांसाठी आर्थिक पाठबळ असणे आवश्यक आहे. ते रोहन यांना मिळाले. जपानसारख्या देशातील राजघराण्यातील व्यक्तींसोबत त्यांनी काम केले आहे.त्यांनी विदेशात कंपनी सुरू केल्यानंतर मायदेशाला न विसरता भरभराटीस आलेला उद्योग भारतात सुरू करून येथील औद्योगिक विकासास हातभार लावला. येथील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.
पालकमंत्र्यांनी केले कौतुक
सातासमुद्रापार भरारी घेत यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आल्यानंतर मायदेशात परत येऊन उद्योग सुरू करणार्या रोहन यांचा शुक्रवारी धाबेकर फार्म हाऊसवर एका छोटेखानी कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या सोहळ्य़ाला खासदार संजय धोत्रे, आ. भाऊसाहेब फुंडकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. राजेंद्र पाटणी, आ. गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, मनपा आयुक्त अजय लहाने, नानासाहेब उजवणे, वसंतराव खेडकर, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, वसंतराव खोटरे, अनिल धाबेकर, डॉ. सुभाष कोरपे, बाबाराव विखे, सुनील पाटील, अँड. अनंत खेळकर यांच्यासह गणमान्य व्यक्तींनी हजेरी लावली होती.