अकोला : देशी कट्टा बाळगणार्‍या युवकाची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 09:41 PM2018-02-14T21:41:38+5:302018-02-14T21:42:10+5:30

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कामठा येथील रहिवासी एक युवक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेऊन अशोक वाटिका चौकात असल्याच्या माहितीवरून शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या पथकाने मंगळवारी त्याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Akola: A young man, who is a countryman, will be sent to jail | अकोला : देशी कट्टा बाळगणार्‍या युवकाची कारागृहात रवानगी

अकोला : देशी कट्टा बाळगणार्‍या युवकाची कारागृहात रवानगी

googlenewsNext
ठळक मुद्देशहर पोलिसांनी सदर युवकास मंगळवारी अशोक वाटीका चौकात अटक केली होती

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कामठा येथील रहिवासी एक युवक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेऊन अशोक वाटिका चौकात असल्याच्या माहितीवरून शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या पथकाने मंगळवारी त्याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
 मूर्तिजापूर तालुक्यातील कामठ येथील रहिवासी राजेश अवधूत ठोंबरे (३५) हा अशोक वाटिका चौकातील गढिया हॉस्पिटलसमोर कमरेत देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेऊन असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकाला कामाला लावून युवकास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची झडती घेतली असता युवकाच्या कमरेजवळ ठेवलेला देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त केले. या साहित्याची किंमत सुमारे ३0 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Web Title: Akola: A young man, who is a countryman, will be sent to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.