अकोल्यातील युवकाचा दगडपारवा पारवा धरणात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 06:54 PM2020-10-19T18:54:02+5:302020-10-19T18:54:41+5:30

Akola Youth drowning in Dagdaparva dam शे. दानिश शे. नईम (२३) हा युवक दोन मित्रांसह तालुक्यातील दगडपारवा येथील धरणात पोहण्यासाठी गेला होता.

Akola Youth dies after drowning in Dagdaparva dam | अकोल्यातील युवकाचा दगडपारवा पारवा धरणात बुडून मृत्यू

अकोल्यातील युवकाचा दगडपारवा पारवा धरणात बुडून मृत्यू

googlenewsNext

बार्शीटाकळी/ पिंजर: तालुक्यातील दगडपारवा धरणात बुडून एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पिंजर येथील गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी अवघ्या २० मिनिटात मृतदेह शोधून काढला. प्राप्त माहितीनुसार अकोल्यातील गंगानगर येथील रहिवासी शे. दानिश शे. नईम (२३) हा युवक दोन मित्रांसह तालुक्यातील दगडपारवा येथील धरणात पोहण्यासाठी गेला होता. त्याचा अचानक पाय घसरून तो खोल पाण्यात बुडाला. याबाबत त्याच्या दोन मित्रांनी पोलीस स्टेशनला माहिती देताच बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाओ पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी माहिती दिली. जीवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी उमेश बिल्लेवार, सागर आटेकर, अंकुश सदाफळे, धीरज राऊत, मयूर कळसकार, सूरज ठाकूर, ओम साबळे, मयूर सळेदार, शिवम वानखडे हे सर्च ऑपरेशन साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लगेच सर्च आपरेशन सुरू करीत अवघ्या २० मिनिटात मृतदेह शोधून काढला. यावेळी घटनास्थळी ठाणेदार तिरुपती व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Akola Youth dies after drowning in Dagdaparva dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.