राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत अकोल्याचा करण करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
By रवी दामोदर | Published: January 2, 2024 03:52 PM2024-01-02T15:52:11+5:302024-01-02T15:52:25+5:30
महाराष्ट्रातील ८ विभागातील खेळाडूंच्या सामने व निवड चाचणीमधून करण डिक्करची महारष्ट्र शालेय क्रिकेट संघात निवड झाली आहे.
अकोला : स्थानिक अकोला क्रिकेट क्लबचा खेळाडू करण डिक्कर याने राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले असून, आता पटना येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत तो महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. १७ वर्षाआतील महाराष्ट्र संघात करण डिक्करची निवड झाली आहे. हि बाब जिल्ह्याच्या क्रिडा क्षेत्रासाठी अभिमानाची असून, जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शहरातील माउंट कार्मेल हायस्कूल व अकोला क्रिकेट क्लबचा सलामीला खेळणारा शैलीदार डावखुरा फलंदाज करण डिक्करची १७ वर्षाखालील महारष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महारष्ट्र राज्य, पुणे यांच्या विद्यामाने जिल्हा क्रीडा परिषद, धुळे व धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत राज्यस्तर शालेय क्रिकेट (१७ वर्षाआतील मुले) क्रीडा स्पर्धा शिरपूर येथे संपन्न झाल्या. महाराष्ट्रातील ८ विभागातील खेळाडूंच्या सामने व निवड चाचणीमधून करण डिक्करची महारष्ट्र शालेय क्रिकेट संघात निवड झाली आहे.
पटना येथे होणार राष्ट्रीय स्पर्धा
राष्ट्रीय स्तरावरील (आंतरराज्य ) क्रिकेट स्पर्धा जानेवारीच्या उत्तार्धार्त पटना (बिहार) येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र संघ सराव शिबिर करून पटनाकरीता रवाना होणार, अशी माहिती अकोला क्रिकेट क्लब जिल्हा हौशी क्रिकेट संघटने मार्फत कळविण्यात आली आहे. करण डिक्करला माउंट कार्मेलचे प्राचार्य फादर जोशलीन तथा अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अशोक तापडिया, उपाध्यक्ष गुरमंदरसिंग छतवाल, सचिव ओम्रकाश बाजोरिया, सहसचिव नरेंद्र पटेल, ऑडीटर मधुकर घोंगे, कर्णधार जावेदअली, सदस्य श्रीराम झुनझुनवाला, शरद अग्रवाल, मनोहर अगडते क्लबचे मार्गदर्शक विजय देशमुख, सुरेश पाटील, विजय तोष्णीवाल माझी कर्णधार भरत डिक्कर आदींनी मार्गदर्शन केले आहे.