अकोला जिल्हा : दिग्रस फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 07:43 PM2017-12-21T19:43:49+5:302017-12-22T02:27:02+5:30

पातूर (अकोला): भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अकोल्याचा युवक जागीच ठार झाला. ही घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता पातूर बाभुळगाव रोडवरील दिग्रस फाट्याजवळ घडली. प्रशांत विश्राम इंगळे  (३0) रा. रमेश नगर डाबकी रोड अकोला असे मृतक युवकाचे नाव आहे. 

Akola: Youth killed in an unknown vehicle near Digras Phata | अकोला जिल्हा : दिग्रस फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

अकोला जिल्हा : दिग्रस फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

googlenewsNext
ठळक मुद्देपातूर-बाभुळगाव मार्गावर घडली घटनामृत युवक - प्रशांत विश्राम इंगळे हा अकोल्यातील रमेश नगर, डाबकी रोड येथील रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर (अकोला): भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अकोल्याचा युवक जागीच ठार झाला. ही घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता पातूर बाभुळगाव रोडवरील दिग्रस फाट्याजवळ घडली. प्रशांत विश्राम इंगळे  (३0) रा. रमेश नगर डाबकी रोड अकोला असे मृतक युवकाचे नाव आहे. 
प्रशांत इंगळे  हे वाडेगाव येथील सासरवाडीत चार ते पाच दिवसापासून मुक्कामी होते. त्यांचे मामा पातुरात राहत असल्यामुळे त्यांच्या भेटीसाठी वाडेगावकडून पातुरकडे ते  स्कुटी क्रमांक एमएच ३0 एक्यू ५३९२ ने येत होते. दरम्यान, दिग्रस फाट्याजवळ डाव्या बाजुला लघुशंका करून रस्ता ओलांडत असताना पाठीमागून येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांना जबरदस्त धडक दिली. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला व ते जागीच ठार झाला. मृतक हे जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे नगर रचना विभागात अनुरेखक पदावर कार्यरत होते. त्यांचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. २७ डिसेंबरला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवससुद्धा होता. त्यांना आईवडील, एक भाऊ व चार बहिणी आहेत. त्यांचे शव उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले असून वृत लिहेपर्यंत अज्ञात वाहना चालकाविरुद्ध कलम ३0४ (अ) नुसार गुन्हा दाखल करणे सुरू होते. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Akola: Youth killed in an unknown vehicle near Digras Phata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.