जिल्हा परिषदेचे ३२ सदस्य प्रशिक्षणासाठी 'यशदा'कडे रवाना!
By संतोष येलकर | Published: September 4, 2022 06:36 PM2022-09-04T18:36:59+5:302022-09-04T18:37:29+5:30
अकोला जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह ३२ सदस्य प्रशिक्षणासाठी रविवारी सायंकाळी पुणे येथील 'यशदा' कडे रवाना झाले.
अकोला: जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह ३२ सदस्य प्रशिक्षणासाठी रविवारी सायंकाळी पुणे येथील 'यशदा' कडे रवाना झाले. शासन आणि जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि विकासकामे, पंधराव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीतून विकासकामांचे आराखडे तसेच विविध विकासकामांचे नियोजन, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, सभागृहातील कामकाज आदी विषयांवर अकोला जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे सोमवार, ५ सप्टेंबरपासून तीन दिवसीय प्रशिक्षण पुणे येथील 'यशदा' येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने रविवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या ५३ पैकी ३२ सदस्य अकोल्यातुन पुण्याकडे रवाना झाले.
रवाना झालेल्यांमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, शिवसेना गटनेता गोपाल दातकर, डॉ. प्रशांत अढाऊ, राम गव्हाणकर, आम्रपाली खंडारे, अर्चना राऊत, विनोद देशमुख आदी सदस्यांचा समावेश आहे. तीन दिवसांच्या प्रशिक्षण नंतर संबंधित जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य जिल्हा परिषदेत परतणार आहेत आहेत.