अकोला जिल्हा परिषदेत २0 कर्मचा-यांची नियुक्ती
By admin | Published: January 12, 2016 01:47 AM2016-01-12T01:47:54+5:302016-01-12T01:47:54+5:30
‘सीईओं’चा आदेश; रिक्त पदांवर पदस्थापना.
अकोला: जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांची रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या विविध संवर्गातील २0 कर्मचार्यांच्या नियुक्तीचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम. देवेंदर सिंह यांनी सोमवारी दिला.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम, आरोग्य, पंचायत व इतर विभागांतर्गत कर्मचार्यांची ४५ रिक्त पदे भरण्यासाठी गत महिन्यात भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यामध्ये आरोग्य विभागांतर्गत आरोग्यसेविका पदांव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी, कनिष्ठ अभियंता, तारतंत्री या पदांसह २0 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सोमवारी दिला. रिक्त पदे असलेल्या ठिकाणी विविध संवर्गातील कर्मचार्यांची पदस्थापना करण्यात आली असल्याचे एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.