कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 10:11 AM2021-04-10T10:11:17+5:302021-04-10T10:11:32+5:30
Akola Zilla Parishad : ७ एप्रिलपासून जिल्हा परिषदेचे एक प्रवेशद्वार बंद करण्यात आले.
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. एका प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले आहे, तर दुसऱ्या प्रवेशद्वारातून कामानिमित्त आलेल्या नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा परिषद परिसरात येणाऱ्या नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा परिषदेत गर्दी होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत ७ एप्रिलपासून जिल्हा परिषदेचे एक प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून, एका प्रवेशद्वारातून कामानिमित्त आलेल्या नागरिकांना जिल्हा परिषदेत प्रवेश देण्यात येत आहे.