अकोला जिल्हा परिषदेत आता प्रत्येक मंगळवार ‘स्वच्छतावार’!
By admin | Published: November 6, 2014 11:05 PM2014-11-06T23:05:56+5:302014-11-06T23:25:26+5:30
राज्यातील पहिला उपक्रम: अधिकारी-कर्मचारी करणार साफसफाई.
संतोष येलकर/अकोला
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अकोला जिल्हा परिषदेत यापुढे आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेत अधिकारी आणि कर्मचार्यांच्या सक्रिय सहभागातून साफसफाईचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रत्येक मंगळवार ह्यस्वच्छतावारह्ण ठरणार आहे. आठवड्यातून एक दिवस स्वच्छतेचा उपक्रम सुरु करणारी, अकोला जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या २ ऑक्टोबरपासून देशभरात ह्यस्वच्छ भारत मिशनह्ण राबविले जात आहे. या स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून, जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या कार्यालयांसह, कार्यालय परिसर, तसेच आवार परिसरात आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व वेगवेगळ्या संवर्गातील कर्मचारी स्वच्छतेचे काम करणार आहेत. या स्वच्छता मोहिमेतच जिल्हा परिषद आवारातील विविध कार्यालयांच्या इमारतींची रंगरंगोटीही करण्यात येणार असून, कचरा साठविण्यासाठी ठिकठिकाणी कचरापेट्या ठेवण्यात येणार आहेत. आठवड्यातून प्रत्येक मंगळवारी स्वच्छता मोहिम राबविण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले असून, यासंदर्भात लवकरच मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून परिपत्रक काढण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे अकोला जिल्हा परिषदेत आठवड्यातील प्रत्येक मंगळवार ह्यस्वच्छतावारह्ण ठरणार आहे.
स्वच्छतेबाबत कर्मचार्यांमध्ये जागृता असावी, स्वच्छतेची भावना वाढीस लागावी, कामाचे ठिकाण स्वच्छ असावे, यासाठी एक प्रयोग म्हणून येत्या मंगळवारपासून अकोला जिल्हा परिषदेच्या अधिनस्त सर्व कार्यालय आणि परिसरात स्वच्छता अभियान राबविले जाईल. दर मंगळवारी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
अरूण उन्हाळे यांनी सांगीतले.