जिल्हा परिषदेत 'वंचित'चेच फटाके; महाविकास आघाडीचा फज्जा! अध्यक्षपदी संगीता अढाऊ; उपाध्यक्षपदी सुनील फाटकर विजयी

By संतोष येलकर | Published: October 17, 2022 04:52 PM2022-10-17T16:52:04+5:302022-10-17T16:52:26+5:30

अध्यक्षपदी संगीता अढाऊ; उपाध्यक्षपदी सुनील फाटकर विजयी

Akola Zilla Parishad Sangeeta Adhaau as President; Sunil Phatkar won as vice president | जिल्हा परिषदेत 'वंचित'चेच फटाके; महाविकास आघाडीचा फज्जा! अध्यक्षपदी संगीता अढाऊ; उपाध्यक्षपदी सुनील फाटकर विजयी

जिल्हा परिषदेत 'वंचित'चेच फटाके; महाविकास आघाडीचा फज्जा! अध्यक्षपदी संगीता अढाऊ; उपाध्यक्षपदी सुनील फाटकर विजयी

googlenewsNext

अकोला: जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत वर्चस्व राखत वंचित बहुजन आघाडीने सोमवारी विजय मिळविला. अध्यक्षपदी संगीता अढाऊ व उपाध्यक्षपदी सुनील फाटकर विजयी झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेत 'वंचित' च्या विजयाचे फटाके फुटले असून , महाविकास आघाडीचा फज्जा उडाला.

पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवडणूक १७ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. त्यामध्ये विद्यमान सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या संगीता अढाऊ यांची अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी सुनील फाटकर यांनी विजय मिळविला. दोन्ही पदांवर महाविकास आघाडीच्या  उमेदवांचा पराभव झाला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 'वंचित' च्या संगीता अढाऊ  यांना २५ व महाविकास आघाडीच्या किरण अवताडे मोहोड यांना २३ मते मिळाली. 

तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत 'वंचित' चे सुनील फाटकर यांना २५ आणि महाविकास आघाडीचे अपक्ष व विद्यमान सभापती सम्राट डोंगरदिवे यांना २३ मते मिळाली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदी विजय मिळविल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नीळ व गुलाल उधळीत आणि फटाक्यांची आतषबाजी करीत विजयाचा जल्लोष करण्यात आला.

Web Title: Akola Zilla Parishad Sangeeta Adhaau as President; Sunil Phatkar won as vice president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला