अकोला जिल्हा परिषदेचे कामकाज चालणार ‘व्हॉइस टायपिंग’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:44 PM2019-05-13T12:44:31+5:302019-05-13T12:44:32+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या कामकाजात गती आणण्यासाठी संगणकावर आता थेट ‘व्हॉइस टायपिंग’द्वारे फायली तयार केल्या जाणार आहेत.
अकोला : जिल्हा परिषदेच्या कामकाजात गती आणण्यासाठी संगणकावर आता थेट ‘व्हॉइस टायपिंग’द्वारे फायली तयार केल्या जाणार आहेत. त्यासाठी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, तसेच गरज असलेल्यांना संगणक, त्यावर अॅपद्वारे टायपिंगची सोय करण्यासाठी खरेदीचा प्रस्तावही तयार केला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच (एमकेसीएल) महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या पुणे येथील मुख्यालयात भेट दिली आहे. त्या भेटीमध्ये प्रशासकीय कामकाजात करावयाच्या सुधारणांबाबत चर्चा झाली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत तयार होणाºया फायलींची संख्या मोठी आहे. त्यातच फायली तयार करणाºया कर्मचाºयांची टंकलेखनाची गती, संगणकाच्या ज्ञानामध्ये बºयाच मर्यादा आहेत. त्यामुळे फायलींचा निपटारा करणे, सभांचे इतिवृत्त तयार होण्याला बराच विलंब लागतो. त्यावर मात करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संगणकावर टंकलेखन करण्याऐवजी अद्यावत अॅपद्वारे ‘व्हॉइस टायपिंग’चा वापर करण्याची तयारी सुरू केली आहे. सर्व विभागातील कर्मचाºयांना व्हॉइस टायपिंगद्वारे फाइल तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच संगणकावर अॅप उपलब्ध करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी ‘एमकेसीएल’कडून मदत केली जाईल. राज्यातील जिल्हा परिषदांमध्येही लवकरच हा उपक्रम सुरू होणार असल्याची माहिती आहे.
- संगणक, अॅपसाठी खर्च
जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील संगणक कालबाह्य आहेत. त्यामुळे नवीन संगणक खरेदी करावे लागणार आहेत. त्यासाठीचा निधी आणि खरेदी प्र्रक्रिया कशी करावी, यावर जिल्हा परिषद प्रशासनाचा खल सुरू आहे. शासन निधी की सेसफंडातून खर्च करावा, या मुद्यांवरही आता हा उपक्रम राबविला जाणार की नाही, हे ठरणार आहे.
- रायटिंग, टायपिंग बाद होण्याची चिन्हे
फायली तयार करण्यासाठी आधी कनिष्ठ लिपिकापासून ते मुख्य अधिकाºयांपर्यंत सर्वच हस्ताक्षराने नोंदी करून स्वाक्षरी करीत, त्यानंतर काही प्रमाणात संगणकीय टायपिंग करून फायली तयार झाल्या. तरीही त्यावर मत नोंदविणारे अधिकारी हस्ताक्षरातच नोंद करून स्वाक्षरी करीत, आता ते दोन्ही प्रकार बाद होऊन थेट व्हॉइस टायपिंगचा पर्याय उपलब्ध झाला. त्यातून रायटिंग, टायपिंग बाद होण्याची शक्यता आहे.