Akola: अकोला जिल्हा परिषदेचा ४३ कोटींचा ' बजेट ' मंजूर! प्रस्तावित योजना अन् विकासकामांसाठी निधीची तरतूद
By संतोष येलकर | Published: March 24, 2023 07:46 PM2023-03-24T19:46:29+5:302023-03-24T19:46:58+5:30
Akola: अकोला जिल्हा परिषदेचा २०२३- २४ या आर्थिक वर्षाचा ४३ कोटी २९ लाख ४९ हजार रुपयांच्या तरतुदीचा मूळ अर्थसंकल्प (बजेट) जिल्हा परिषदेच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.
- संतोष येलकर
अकोला - अकोला जिल्हा परिषदेचा २०२३- २४ या आर्थिक वर्षाचा ४३ कोटी २९ लाख ४९ हजार रुपयांच्या तरतुदीचा मूळ अर्थसंकल्प (बजेट) जिल्हा परिषदेच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनील फाटकर यांनी जिल्हा परिषदेचा २०२२- २३ या आर्थिक वर्षातील सुधारित ३४ कोटी ५० लाख १९ हजार रुपयांचा आणि २०२३- २४ या आर्थिक वर्षातील ४३ कोटी २९ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मूळ अर्थसंकल्प सभागृहात मांडला. या ' बजेट ' ला सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये समाजकल्याण, महिला बालकल्याण, कृषी शिक्षण, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, लघु सिंचन आदी विभागाच्या विविध योजना आणि प्रस्तावित विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे, रिजवाना परवीन, माया नाईक, योगिता रोकडे, सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेता गोपाल दातकर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.