अकोला जिल्हा परिषदेच्या कारभारावर ओढले ताशेरे!

By admin | Published: January 30, 2016 02:22 AM2016-01-30T02:22:05+5:302016-01-30T02:22:05+5:30

एसटी कल्याण समितीची तीव्र नाराजी

Akola Zilla Parishad's work has been dragged! | अकोला जिल्हा परिषदेच्या कारभारावर ओढले ताशेरे!

अकोला जिल्हा परिषदेच्या कारभारावर ओढले ताशेरे!

Next

अकोला: जिल्हा परिषदमार्फत अनुसूचित जामातीसाठी राबविण्यात येणार्‍या योजना, उपलब्ध निधी आणि लाभार्थ्यांच्या याद्यासह विविध मुद्दय़ांवर अपूर्ण माहिती देण्यात आल्याने, तीव्र नाराजी व्यक्त करीत, विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती (एसटी) कल्याण समितीने शुक्रवारी जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. अनुसूचित जमाती कल्याण समितीकडून अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, योजनांसाठी उपलब्ध निधी, त्यामधून झालेला खर्च व अखर्चित निधी, योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड व लाभार्थी याद्या, तसेच विविध विभागातील अनुसूचित जमाती प्रवर्गनिहाय अधिकारी व कर्मचार्‍यांची मंजूर पदे, रिक्त पदे, पदोन्नती यासह विविध मुद्दय़ांची माहिती जिल्हा परिषद अधिकार्‍यांकडून घेण्यात आली. या बैठकीला समितीप्रमुख आ. रुपेश म्हात्रे यांच्यासह समिती सदस्य आ. राजू तोडसाम, आ. पास्कल धनारे,आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. काशीराम पावरा यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा परिषदेचे विविध विभागप्रमुख उपस्थित होते. समितीकडून विविध १९ मुद्दय़ांची माहिती मागविण्यात आली. त्यापैकी १३ मुद्दय़ांवर समितीकडून घेण्यात आलेल्या माहितीमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या, अनुसूचित जामाती प्रवर्गातील कर्मचार्‍यांची मंजूर पदे, रिक्त पदे, भरती, पदोन्नती आणि जात वैधतासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे पूर्ण माहिती उपलब्ध नसल्याने, अधिकार्‍यांना याबाबतची माहिती समितीपुढे मांडता आली नाही. अपूर्ण माहिती उपलब्ध असल्याने, समितीने तीव्र नाराजी व्यक्त करीत, जिल्हा परिषद प्रशासनावर चांगलेच ताशेरे ओढले. यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Akola Zilla Parishad's work has been dragged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.