अकोला : जि.प. शिक्षण सभापतीच्या स्वीय सहायकाला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 09:40 PM2017-12-22T21:40:45+5:302017-12-22T21:50:02+5:30

अकोला : जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांचा लाचखोर स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरेला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २६ डिसेंबरपयर्ंत पोलीस कोठडीत रवानगी केली. लाचखोरीतील रक्कम जप्त केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आता या प्रकरणाशी संबंध असलेल्या काही जणांचा शोध सुरू केला आहे. 

Akola: zip Police custody till the assistant teacher of Education Chairman till Tuesday | अकोला : जि.प. शिक्षण सभापतीच्या स्वीय सहायकाला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी

अकोला : जि.प. शिक्षण सभापतीच्या स्वीय सहायकाला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देलाचखोर स्वीय सहायक - श्रीकांत महादेवराव ठाकरे शालेय पोषण आहार अधीक्षकांकडे केली होती पैशाची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांचा लाचखोर स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरेला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २६ डिसेंबरपयर्ंत पोलीस कोठडीत रवानगी केली. लाचखोरीतील रक्कम जप्त केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आता या प्रकरणाशी संबंध असलेल्या काही जणांचा शोध सुरू केला आहे. 
आरोपी श्रीकांत ठाकरे याने काही महिन्यांपूर्वी अकोट येथील शालेय पोषण आहार अधीक्षकांकडे पैशाची मागणी केली होती. आहार योजनेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत, त्याने त्यांना नियमित पैसे द्यावे लागतील, अशी मागणी अधीक्षकांकडे केली होती; परंतु शालेय पोषण आहार अधीक्षकाने मागणी पूर्ण केल्यास, त्याने कारवाईची धमकी दिली होती. त्यामुळे अधीक्षकांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची प्राथमिक चौकशी केली. चौकशीमध्ये तथ्य आढळून आले. श्रीकांत ठाकरे याने मागणी केल्यानुसार शालेय पोषण आहार अधीक्षकाने पैसे देण्याची तयारी दाखविली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून, त्याला लाच स्वीकारताना अटक केली होती. 

Web Title: Akola: zip Police custody till the assistant teacher of Education Chairman till Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.