अकोला परिमंडळात आॅनलाइन वीज बिल भरण्याचा चढता आलेख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:01 PM2018-05-16T14:01:47+5:302018-05-16T14:01:47+5:30

 अकोला : ‘दिवस-रात्र असता आॅनलाइन, मग वीज बिल भरायला का लावता लाइन’, या महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत वीज ग्राहकांनी आता वीज देयक आॅनलाइन भरण्याची कास धरली आहे.

Akola zone : Online Bill Bill Payment number increase | अकोला परिमंडळात आॅनलाइन वीज बिल भरण्याचा चढता आलेख!

अकोला परिमंडळात आॅनलाइन वीज बिल भरण्याचा चढता आलेख!

googlenewsNext
ठळक मुद्देचार वर्षात १६ कोटींचा वार्षिक भरणा गेला १९१ कोटींवर.महावितरणने अनेक सेवा आॅनलाइन उपलब्ध करून दिल्या असून, आता वीज ग्राहकही तेवढेच तंत्रस्नेही झाले आहेत. महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये आॅनलाइन देयक भरण्याचा कल


अतुल जयस्वाल

 अकोला : ‘दिवस-रात्र असता आॅनलाइन, मग वीज बिल भरायला का लावता लाइन’, या महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत वीज ग्राहकांनी आता वीज देयक आॅनलाइन भरण्याची कास धरली आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये आॅनलाइन देयक भरण्याचा कल वाढत असल्याचे गत चार वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०१४ या वर्षभरात झालेला १६ कोटी ९७ लाखांचा भरणा वर्ष २०१७ मध्ये तब्बल १९१ कोटी ६ लाख रुपयांवर गेल्याने आॅनलाइन देयक भरण्याचा आलेख चढता असल्याचे अधोरेखित झाले आहे.
झपाट्याने बदलणाऱ्या काळासोबत ‘पेपरलेस’च्या दिशेने वाटचाल करणाºया महावितरणने अनेक सेवा आॅनलाइन उपलब्ध करून दिल्या असून, आता वीज ग्राहकही तेवढेच तंत्रस्नेही झाले आहेत. महावितरणने माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना घरबसल्या बिल देयकाचा भरणा करता यावा म्हणून आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा वापर करीत वर्ष २०१४ मध्ये अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ९४५ वीज ग्राहकांनी १६ कोटी ९७ लाख रुपयांचा आॅनलाइन वीज बिल भरणा केला होता. त्यानंतर २०१५ मध्ये ४ लाख १२ हजार २३० वीज ग्राहकांनी ५७ कोटी ३६ लाख रुपये आॅनलाइन भरले. वर्ष २०१६ मध्ये ६ लाख ९६ हजार ५११ वीज ग्राहकांनी १०० कोटी रुपयांचे वीज बिल आॅनलाइन जमा केले. वर्ष २०१७ मध्ये मोठी वाढ होऊन, १३ लाख १३ हजार ४६८ वीज ग्राहकांनी तब्बल १९१ कोटी ६ लाख रुपयांचा आॅनलाइन वीज बिल भरणा केल्याचे महावितरणने जारी केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

संकेतस्थळ, मोबाइल अ‍ॅपचा वापर!
महावितरणच्या ग्राहकांना संकेतस्थळावरून तसेच मोबाइल अ‍ॅपचा वापर करून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व नेट बँकिंगद्वारे बिल भरता येते, तरी महावितरणने या दिलेल्या सुविधांचा वापर करून रांगेत वेळ न घालवता कधीही बसल्या जागेवरच वीज बिलाचा भरणा करावा, असे आवाहन अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी केले आहे.

२०१७ मध्ये झालेला जिल्हानिहाय आॅनलाइन भरणा
जिल्हा       ग्राहक             रक्कम

अकोला     ३,०९,०७२        ५८ कोटी ३७ लाख
बुलडाणा    ८,३६,०३८       १०९ कोटी ४ लाख
वाशिम     १,६८,३५८         २३ कोटी ८३ लाख
-------------------------------------------
परिमंडळ    १३,१३४६८         १९१ कोटी ६ लाख

 

Web Title: Akola zone : Online Bill Bill Payment number increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.