Akola ZP Election : मत विभाजनाचा भाजप-सेनेला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 02:01 PM2020-01-10T14:01:56+5:302020-01-10T14:02:00+5:30
सात गटांमध्ये मत विभाजनाचा फटका या दोन्ही पक्षांना बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना स्वतंत्र लढल्याने या दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे सर्वच गावांमध्ये त्या उमेदवारांना कमी-अधिक प्रमाणात मतदान झाले. एकगठ्ठा मतांचे विभाजन झाल्याने त्याचा फटका या दोन्ही पक्षांना बसला आहे. जिल्हा परिषदेच्या १४ गटांमध्ये शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यापैकी सात गटांमध्ये भाजपला तिसºया क्रमांकाची मते मिळाली आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या मतांची बेरीज विजयी उमेदवारापेक्षा अधिक आहे. त्यामुळे किमान त्या सात गटांमध्ये मत विभाजनाचा फटका या दोन्ही पक्षांना बसला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने सर्व म्हणजे, ५३ गट आणि १०५ गणांत उमेदवार दिले. शिवसेनेनेही कमी-अधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी उमेदवार दिले.
दोन्ही पक्षांची विचारधारा, ध्येय-धोरणे काही प्रमाणात समान आहेत. त्यामुळे त्यांचे मतदारही ठरलेले आहेत. ग्रामीण भागातील मतदारांना एकाच वेळी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना स्वतंत्रपणे मतदान करण्याची वेळ आली.
त्यातून एकगठ्ठा मतांचे विभाजन झाल्याने दोन्ही पक्षांचे उमेदवार अल्पमतात आले. इतर पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळाली. या दोघांच्या बेरजेपेक्षा कमी मतांच्या संख्येने ते निवडून आले. त्यामध्ये जिल्ह्यातील ५३ पैकी १४ गटांचा समावेश आहे. या गटांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला दुसºया क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्यापैकी सात गटांमध्ये स्पर्धेत असलेल्या भाजप उमेदवाराला तिसºया क्रमांकाची मते मिळाली आहेत. दोन पक्षांचा मिळून एकच उमेदवार असता तर या दोन्ही पक्षांना सात जिल्हा परिषद गटांत विजय मिळाला असता, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत.
सेना जिल्हाप्रमुखांचा गटही गेला
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या चोंढी गटातून जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केले होते. यावेळी त्या गटातून त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला रिंगणात उतरविले; मात्र त्यांना आपला गट राखता आला नाही.
४त्याचवेळी त्यांच्या गावाचा समावेश असलेला सस्ती गट शिवसेनेच्या उमेदवाराने काबीज केला. चोंढी, विवरा, आलेगाव गटातील लढत त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती. त्यापैकी दोन भारिप-बमसंने तर एक काँग्रेसने राखला आहे.
दुसºया, तिसºया क्रमांकाची मते मिळालेले गट
शिवसेना, भाजपच्या उमेदवाराला दुसºया व तिसºया क्रमांकाची मते मिळालेल्या गटांमध्ये उगवा, बाभूळगाव, आगर, कुरणखेड, चांदुर, चोहोट्टा, माना, दानापूर, भांबेरी, अंदुरा, निमकर्दा, पारस, शिर्ला, चोंढी व विवरा या गटांचा समावेश आहे.