अकोलकरांनो, गरज नसेल तर बाहेर पडूच नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:04 PM2020-03-27T18:04:07+5:302020-03-27T18:06:35+5:30

सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवणे बंधनकारक असले तरी ते पाळले जात नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

Akolakar, if you don't need it, don't quit! | अकोलकरांनो, गरज नसेल तर बाहेर पडूच नका!

अकोलकरांनो, गरज नसेल तर बाहेर पडूच नका!

Next
ठळक मुद्देसवलतीचा गैरफायदा घेत अशा वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणे पसंत केले. शुक्रवारी अकोल्यातील अनेक भागांमध्ये वाहनांची वर्दळ तुलनेने वाढलेली दिसली.

अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे शुक्रवारपासून अनेक नागरिकांनी या सवलतीचा गैरफायदा घेत अशा वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणे पसंत केले. त्यामुळे गत दोन दिवसांपेक्षा शुक्रवारी अकोल्यातील अनेक भागांमध्ये वाहनांची वर्दळ तुलनेने वाढलेली दिसली. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना नागरिकांनी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवणे बंधनकारक असले तरी ते पाळले जात नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, टिळक रोड, गांधी रोड, जनता बाजार, गोरक्षण रोड, शहरातून जाणारा राष्टÑीय महामार्ग, कौलखेड रोड, डाबकी रोड अशा अनेक मार्गांवर शुक्रवारी वाहनांची वर्दळ वाढल्याचे चित्र होते.
 
बाहेर पडण्यापूर्वीच विचार करा?
सध्या लावण्यात आलेली संचारबंदी ही तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्याचे व देशाच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी आहे. केवळ सवलत मिळाली म्हणून आपण खरेदीच्या नावाखाली फेरफटका मारायला बाहेर जात असाल तर बाहेर पडण्यापूर्वीच विचार करा, सगळेच घरी आहेत मग मी एकटा गेलो तर काय बिघडले, असा प्रत्येकानेच विचार केला तर ‘सोशल डिस्टन्सिंग’साठी लावण्यात आलेल्या संचारबंदीला अर्थच उरणार नाही. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून घराबाहेर पडणे टाळता आले तर उत्तमच.
 

 

Web Title: Akolakar, if you don't need it, don't quit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.