अकोल्याची कृष्णा मिश्रा ठरली ग्लोरियस ट्रॅडिशनल क्विन मीस इंडिया २०२३
By Atul.jaiswal | Published: September 7, 2023 05:43 PM2023-09-07T17:43:52+5:302023-09-07T17:44:01+5:30
कृष्णा हिने ऑनलाइन ऑडिशनद्वारे टास्क पूर्ण करत, मिस अकोला हा खिताब पटकावला.
अकोला : ग्लोरीयस ट्रॅडिशनल क्वीन इंडिया २०२३ ची महा अंतीम फेरी २८ ऑगस्ट रोजी जयपूर येथील राजस्थान इंटरनॅशनल येथे पार पडली. यामध्ये अकोल्याच्या २१ वर्षीय कृष्णा मिश्रा हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ग्लोरियस ट्रॅडिशनल क्विन मीस इंडिया २०२३ हा खिताब पटकावला. राजस्थानची रुपा सपेरा ही प्रथम उपविजेती, तर सेजल शर्मा ही द्वितीय उपविजेती ठरली.
कृष्णा शर्मा ही अकोल्याच्या एका महाविद्यालयात बी. एस.सी. च्या अंतीम वर्षाला शिकत आहे. या स्पर्धेसासाठी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या ऑनलाइन ऑडिशनमध्ये कृष्णा मिश्रा हिची निवड झाली होती. त्यानंतर कृष्णा हिने ऑनलाइन ऑडिशनद्वारे टास्क पूर्ण करत, मिस अकोला हा खिताब पटकावला. राज्यपातळीसाठी झालेल्या फेरीत कृष्णा ही महाराष्ट्रातून एकमेव विजेती ठरल्याने या स्पर्धेत तीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. जयपूर येथे २६ व २७ असे दोन दिवस झालेल्या फेऱ्यानंतर २८ ऑगस्ट रोजी महाअंतीम फेरी पार पडली. यामध्ये कृष्णा हिला ग्लोरियस ट्रॅडिशनल क्विन मीस इंडिया २०२३ घोषीत करण्यात आले.