अकोल्यातील विधीज्ञांची पंतप्रधानांविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:29 PM2019-04-12T18:29:48+5:302019-04-12T18:29:50+5:30

अकोला- लातुर जिल्ह्यातील औसा येथे ९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा घटनेतील शहिदांचा तसेच एअर स्ट्राईकमध्ये सहभागी जवानांच्या नावावर मते मागीतली. सैन्याच्या नावावर राजकारण करण्याचा हा प्रकार असून यामुळे पंतप्रधानांवर आदर्श आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार अकोल्यातील काही विधीज्ञांनी जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिली.

Akola's layers file complaint of violation of code of conduct against PM | अकोल्यातील विधीज्ञांची पंतप्रधानांविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार

अकोल्यातील विधीज्ञांची पंतप्रधानांविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार

googlenewsNext

अकोला- लातुर जिल्ह्यातील औसा येथे ९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा घटनेतील शहिदांचा तसेच एअर स्ट्राईकमध्ये सहभागी जवानांच्या नावावर मते मागीतली. सैन्याच्या नावावर राजकारण करण्याचा हा प्रकार असून यामुळे पंतप्रधानांवर आदर्श आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार अकोल्यातील काही विधीज्ञांनी जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिली.
अकोला जिल्हाधिकारी तसेच निवडणुक निर्णय अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत विधिज्ञांनी नमूद केले आहे की, पंतप्रधान मोदीनी औसा येथिल सभेत मतदारांना त्याचे मतदान पुलवामा घटनेतील शहिदांना समर्पित होऊ शकते का? तुमचे मतदान वालाकोट येथे एअर स्ट्राईक मध्ये सहभागी सैनिकांसाठी समर्पित होऊ शकते का? अशा शब्दात आवाहन केले. भारतीया सैनिकांच्या व शहिद जवानांच्या नावाचा वापर करून राजकारण करण्याच्या या प्रकारामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचार करण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच यु-टयुब या सोशल मीडीयावर ७ एप्रिल रोजी भाजपा या चॅनलच्या माध्यमातून थीम साँग मध्येही सैनाच्या कारवाईचे फोटो तसेच चित्रफितींचा वापर केला आहे. हासुद्धा आचारसंहितेचा भंग असून यु टयुब वरील भारतीय जनता पार्टी या चॅनलवरही बंदी घालण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या तक्रारीवर अ‍ॅड.मो.परवेज, अ‍ॅड. प्रवीण पी.देशमुख, अ‍ॅड.मंगेश बोर्डे, अ‍ॅड.राजेश डी.पवार, अ‍ॅड.राजेश जाधव, अ‍ॅड.उदय देशमुख, अ‍ॅड.नंदकिशोर शेळके, अ‍ॅड.काजी हसन अली यांच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Akola's layers file complaint of violation of code of conduct against PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.