अकोल्याचे कमाल तापमान घटले; वातावरणात गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 10:31 AM2020-06-05T10:31:19+5:302020-06-05T10:31:41+5:30
४ जून रोजी अकोला शहरात ३०.७ तर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २७.५ डिग्री सेल्सिअस करण्यात आली.
अकोला: जिल्हयात दोन दिवसापासून पूर्व मोसमी पाऊस बरसत असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या वातावरणामुळे कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. मागच्या आठवड्यात ४७.४ अंशावर पोहोचलेल्या तापमानाची नोंद गुरुवार,४ जून रोजी अकोला शहरात ३०.७ तर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २७.५ डिग्री सेल्सिअस करण्यात आली. तर गत २४ तासात गुरुवार, सकाळी८.३० वाजता पर्यँत जिल्हयात ६.१ मिमी पावसाची नोंद हवामान शास्त्र विभागाने केली. पूर्व मोसमी पाऊस पडत असल्याने उकाडा कमी झाला आहे. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करण्याकरिता हा पाऊस पोषक आहे.
आज मुसळधार पावसाचा इशारा
गत २४ तासात गुरुवार, ४ जून रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यँत विदर्भासह अकोला जिल्हयात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून ६.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. उद्या ५ जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.
नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल !
-नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटकचा काही भाग,कोमोरीन,बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात,दक्षिण पूर्व बंगाल उपसगराच्या बहुतांश भाग,मध्य पूर्व बंगाल उपसगराच्या काही भागात सुरू आहे.