अकोल्याचा ‘निनाद’ अमेरिकेत दुमदुमणार : निनाद ओक याचे जलप्रदूषणावर संशोधन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 02:00 AM2018-01-18T02:00:17+5:302018-01-18T02:20:15+5:30
अकोला : सध्या जगाला जलप्रदूषणाची मोठी समस्या भेडसावत आहे. सर्वच राष्ट्रांना जलप्रदूषणासारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जलप्रदूषणासारख्या समस्या सोडविण्यासाठी अनेक राष्ट्रांमध्ये चिंतन, अभ्यास सुरू असतानाच, अकोल्यातील युवा संशोधक निनाद ओक याने वस्त्रोद्योगातील जलप्रदूषणावर महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाची अमेरिकेची सरकारी संस्था असलेल्या अमेरिकन अँकॅडेमी ऑफ सायन्सेसने दखल घेत, त्यांना संशोधन सादरीकरणासाठी पाचारण केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

निनाद हा येथील प्रा. नितीन ओक यांचा मुलगा. निनादचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकोल्यात झाले. त्यानंतर निनादने आयआयटी पवई येथून पर्यावरणशास्त्रात एमटेक केले. मुंबई येथे सिव्हिल इंजिनियरिंग केले. २00३ नंतर प्रतिष्ठेचा एपी श्रेणी प्राप्त करणारा निनाद एकमेव विद्यार्थी आहे.
निनाद सध्या चेन्नई आयआयटीमध्ये पर्यावरण क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. मोहन यांच्या मार्गदर्शनात संशोधन करीत आहे. यापूर्वी तो मुंबई आयआयटीला होता. वस्त्रोद्योगामध्ये मोठय़ा प्रमाणात जलप्रदूषण होते. हे जल वापरण्यायोग्य करण्यावर निनादने संशोधन केले आणि तीन महिन्यांपूर्वी त्याने हे संशोधन अमेरिकन अँकॅडमी ऑफ सायन्सेसकडे सादर केले होते. जगभरातील शेकडो संशोधकांनी सादर केलेल्या संशोधनापैकी निनादचे महत्त्वाचे संशोधन असल्याने, त्याच्या संशोधनाची अमेरिकन अँकॅडमी ऑफ सायन्सेसने निवड केली. अमेरिकेतील हय़ुस्टन येथे २५ ते २९ जून २0१८ दरम्यान होणार्या जागतिक पर्यावरण परिषदेमध्ये निनाद ओक संशोधन सादर करणार आहे. त्याच्या संशोधनाचा निनाद अमेरिकेत दुमदुमणार आहे. निनादच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त अमेरिकन अँकॅडमी ऑफ सायन्सेसने निवड करणं हे अकोलेकरांसाठी गौरवाची बाब आहे. त्याच्या संशोधनामुळे अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.