अकोल्याचे तापमान ३७.८ अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:15 AM2021-06-04T04:15:43+5:302021-06-04T04:15:43+5:30

अकोला : ढगाळ वातावरणामुळे काही दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान ...

Akola's temperature is 37.8 degrees Celsius | अकोल्याचे तापमान ३७.८ अंश सेल्सिअस

अकोल्याचे तापमान ३७.८ अंश सेल्सिअस

googlenewsNext

अकोला : ढगाळ वातावरणामुळे काही दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने काही दिवस मॉन्सून पूर्व पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पारा कमी राहण्याची शक्यता आहे.

हरभऱ्याला जास्तीत जास्त ४८८० रुपये दर

अकोला : खरीप हंगाम सुरू झाला असला तरी बाजार समितीत हरभऱ्याची आवक सुरू आहे. गुरुवारी बाजार समितीत १२८० क्विंटल आवक झाली तर हरभऱ्याला जास्तीत जास्त ४८८० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

वादळासह पावसाने फळपिकांचे नुकसान

अकोला : जिल्ह्यात चार वादळासह पाऊस होत असल्याने संत्रा, कांदा व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासनावर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ

अकोला : शेतकरी रासायनिक खातांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे.

भाजीपाला खरेदीसाठी गर्दी

अकोला : शहरात दुपारी २ पर्यंत सूट देण्यात आली असल्याने भाजीपाला खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत आहे. त्यामुळे ताजनापेठ ते जैन मंदिर या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था बाजाराच्या दिवशी पूर्णपणे कोलमडून पडत आहे.

रिक्त पदे भरण्याची मागणी

अकोला : येथील शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला आहे. शेती हंगामाचे दिवस सुरू आहेत. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येत आहेत; परंतु महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामांवर परिणाम झाला आहे.

Web Title: Akola's temperature is 37.8 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.