अकोल्याचे तापमान ३८.४ अंश सेल्सिअस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:13+5:302021-05-19T04:19:13+5:30
अकोला : ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. मंगळवारी जिल्ह्यात ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमान कमी ...
अकोला : ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. मंगळवारी जिल्ह्यात ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमान कमी असले, तरी दिवसभर उकाडा जाणवत होता. दोन दिवस तापमान घट कायम राहण्याची शक्यता आहे.
-------------------------------------------------
सिंचनाचा प्रश्न
अकोला : जिल्ह्यात विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने बागायतदार शेतकरी हैराण झाले आहे. शेतात असलेला भाजीपाला जगवायचा कसा, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. जिल्ह्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.
-------------------------------------------------
मेंटनन्सची कामे जोरात
अकोला : महावितरणने मेंटनन्सची कामे हाती घेतली आहेत. यासाठी वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. काही भागांत तर तासन तास वीज गुल राहते. उकाड्यामुळे पंख्याअभावी घामाच्या धारा निघत आहेत.
---------------------------------------------------
पाणीपातळी खालावल्याने टंचाई
अकोला : मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. परिणामी, ग्रामीण भागात टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
-----------------------------------------------------
पेट्रोलचे दर वाढल्याने सामान्यांना फटका
अकोला : पुन्हा एकदा केंद्र शासनाने पेट्रोलच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता पेट्रोल शंभरीपार झाले असून, याचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे. जीवनावश्यक वस्तू व पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
-----------------------------------------------------
बँक उघडण्यापूर्वीच लागतात रांगा
अकोला : शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांतील गर्दी दिवसेंदिवस वाढतच असून, खातेधारकांनाही नाहक त्रास होत आहे. शहरातील काही बँकेत बँक उघडण्यापूर्वीच खातेधारकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे.
-----------------------------------------------------