अकोल्याचे तापमान ४०.१ अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:17 AM2021-05-17T04:17:20+5:302021-05-17T04:17:20+5:30

अकोला : जिल्ह्यातील तापमानात दोन दिवसांपासून घट दिसून येत आहे. रविवारी जिल्ह्यातील तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ढगाळ ...

Akola's temperature is 40.1 degrees Celsius | अकोल्याचे तापमान ४०.१ अंश सेल्सिअस

अकोल्याचे तापमान ४०.१ अंश सेल्सिअस

Next

अकोला : जिल्ह्यातील तापमानात दोन दिवसांपासून घट दिसून येत आहे. रविवारी जिल्ह्यातील तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ढगाळ वातावरणामुळे पारा आणखी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

-----------------------------------------------

मूर्तिजापूर, पातूर येथे दूध उत्पादकांचे नुकसान

अकोला : मूर्तिजापूर, पातूर तालुक्यात असंख्य दूध उत्पादक शेतकरी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स बंद राहत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

--------------------------------------------------

कृत्रिम पाणवठेही कोरडे!

अकोला : जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात वन्यप्राण्यांना पाणी पिण्याकरिता काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. ते सध्या कोरडे पडल्याने विशेषत: माकडांचे कळप अन्न व पाण्याच्या शोधात गावोगावच्या नागरी वसाहतींकडे धाव घेत आहेत.

-----------------------------------------------------

मजुरांना रोजगार देण्याची मागणी

अकोला : परिसरातील गावातून रोजगारासाठी परजिल्ह्यात गेलेले शेकडो कामगार गावी परत आले आहेत; मात्र परिसरात शेतीशिवाय कोणतीच कामे नसल्याने हे कामगार बेरोजगार झाले आहेत. प्रशासनाने या कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

----------------------------------------------------

रस्त्याची दैना

अकोला : शहरातील डाबकी रोड रेल्वे क्रॉसिंगपासून ते गायगाव मार्गावर जाणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. रस्ता जागोजागी खोदून ठेवल्याने रस्त्याची दैना झाली आहे.

--------------------------------------------------------

शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मार्गदर्शन

अकोला : गेल्या हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. सोयाबीन व खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याने उभ्या पिकात नांगर फिरविण्याची वेळ आली. पुन्हा ही वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

--------------------------------------------------------

Web Title: Akola's temperature is 40.1 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.