अकोल्यात हॉटेलमधून दारूचा साठा जप्त
By Admin | Published: May 22, 2017 01:32 AM2017-05-22T01:32:34+5:302017-05-22T01:32:34+5:30
अकोला: खडकी येथील हॉटेल शिवनेरीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने रविवारी सायंकाळी छापा टाकून कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: खडकी येथील हॉटेल शिवनेरीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने रविवारी सायंकाळी छापा टाकून कारवाई केली. या ठिकाणावरून दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कौलखेडातील रहिवासी राजू पावसाळे यांच्या मालकीच्या खडकी येथील हॉटेल शिवनेरीमधून देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी रविवारी दुपारी या हॉटेलवर छापा टाकून श्रीराम नगरातील रहिवासी बबन उदेभानजी बोळे, खडकीतील रहिवासी प्रवीण अशोकराव गवई या दोघांना ताब्यात घेतले. तर हॉटेलचा मालक राजू पावसाळे फरार होण्यात यशस्वी झाला. देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक आणि विक्री करताना या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ८ हजार रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी केली.