अकोलेकरांनी अनुभवली स्टार लिंक सॅटेलाईटची प्रकाशमय रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2023 21:20 IST2023-02-02T20:55:44+5:302023-02-02T21:20:08+5:30
Star Link satellites : ही प्रकाशरांग म्हणजे स्टार लिंक सॅटेलाईटची रांग असल्याचे ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी सांगितले.

अकोलेकरांनी अनुभवली स्टार लिंक सॅटेलाईटची प्रकाशमय रांग
अकोला : आकाश निरभ्र असताना अचानक सायंकाळी सात वाजताचे सुमारास अकोल्याच्या आसमंततात वायव्य ते पूर्वेकडे जवळपास ६०ते ६५ दिव्यांच्या विविध रंगी प्रकाशरांगेचा नजारा अकोलेकरांनी अनुभवला. ही रहस्यमयी प्रकाशरांग कसली, अशी चर्चा होत असताना ही प्रकाशरांग म्हणजे स्टार लिंक सॅटेलाईटची रांग असल्याचे ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यात वाडेगाव, पातूर, अकोट व इतर गावांसह अकोला शहरातील विविध भागांमध्ये अनेकांनी ही प्रकाशरांग पाहिली. नुसत्या डोळ्यांनी हजारो लोकांनी हा अनोखा नजारा अनुभवला. अनेकांनी हा उल्कापात किंवा धुमकेतू किंवा लघुग्रहाचे तुकडे असल्याचे वाटले. केवळ अकोलाच नव्हे, तर वाशिम,जळगाव, चंद्रपूरसह राज्यातील अनेक भागांमध्ये हा नजारा पहावयास मिळाल्याची चर्चा आहे. दरम्यान, प्राथमिक निरीक्षणानुसार ही एक स्टार लिंक सॅटेलाईटची रांग असल्याचे समजते. नवीन हिरव्या रंगाच्या धूमकेतूच्या दर्शनाची ओढ असलेल्या आकाश प्रेमींना ही
एक अनोखी आकाशभेट अनुभवता आली, असे खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी सांगितले.